ST कर्मचाऱ्यांचा संप सुरुच ; प्रवाशी हवालदिल, पण ऑनलाईन व ऑफलाईन बुकींगचे पैसे मिळतायत परत 

संपामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या असल्यातरी तिकिटांचे ऑनलाईन व ऑफलाईन बुकींग केलेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळत आहेत. स्वारगेट बस स्थानकातून आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत देण्यात आले आहेत.

ST कर्मचाऱ्यांचा संप सुरुच ; प्रवाशी हवालदिल, पण ऑनलाईन व ऑफलाईन बुकींगचे पैसे मिळतायत परत 
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 3:33 PM

पुणे – एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीकरण करावे.  या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. पुण्यात मध्यरात्री 12 पासून संपाला सुरुवात झाली.  तर सकाळ पासून पुण्यातून एसटीची वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने सोमवारी (आज) मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे. परंतु बैठकीतील निर्णयावर अवलंबून न राहता एसटी कर्मचाऱ्यांनी संपाला सुरूवात केली आहे. शहरातील स्वारगेट , शिवाजीनगर या मुख्य एसटी डेपोसह आणखी तीन डेपोमधील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासून कर्मचाऱ्यांनी  डेपोतच बसून आंदोलनाला सुरुवात केली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांचे मोठे हाल झाले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर कामावर परतणाऱ्या चकारमान्यानाही त्याचा फटका बसला आहे.

तिकिटांचे ऑनलाईन व ऑफलाईन बुकींग पैसे मिळतायत परत 

तिकिटाचे ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. संपामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या असल्यातरी तिकिटांचे ऑनलाईन व ऑफलाईन बुकींग केलेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळत आहेत. स्वारगेट बस स्थानकातून आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना तिकिटाचे पूर्ण पैसे परत देण्यात आले आहेत.

इतक्या गाड्या झाल्या रद्द

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एकट्या स्वारगेट डेपोतून जाणारी 200 एसट्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. या डेपोमधून जवळपास 136 चालक आणि 128 वाहक संपात सहभागी झाले आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये आगार प्रशासन सहभागी नसल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. मात्र जो पर्यंत कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय होता नाही. आमच्या मागण्या मान्य होता नाहीत तोपर्यंत एकही एसटी डेपोच्या बाहेरा पडणार नसल्याची भूमिका आंदोलनात सहाभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

पिंपरीतही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु दुसरीकडे पिंपरी- चिंचवडमधील वल्लभनगर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनीही संपला सुरुवात केली आहे. संपामुळे जवळपास 49 बसेस आगारातच उभ्या आहेत. कर्मचाऱ्यांनी पुकारलेलया संपामुळे आगारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची गर्दी झाली आहे. दिवाळीच्या सुटयांहून परत निघालेल्या प्रवाश्यांचा मोठा खोळंबा झाला आहे.

संबंधित बातम्या :

आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने लावा, 25 हजार कमवा, पुण्यातील 300 कारमालकांची कशी झाली फसवणूक?

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार

दिवाळीतील प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरतोय पिंपरीकरांचा ‘श्वास’

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.