AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, पुरंदरमधील धक्कादायक घटना

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून पुण्यातील पुरंदर तालुक्यात एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, पुरंदरमधील धक्कादायक घटना
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 27, 2021 | 7:30 PM
Share

पुणे : नवीन मोबाईल घेवून दिला नाही म्हणून पुण्यातील पुरंदर तालुक्यात एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील या घटनेने खळबळ माजली आहे. आदित्य रविंद्र दोडके असं या मुलाचं नाव आहे. त्याने साडीच्या साहाय्याने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली (Suicide of a 15 year old boy for demand of Mobile in Purandar Pune).

आदित्य दोडके यानं आपली आजी रोहिणी शंकर दोडके यांना नवीन मोबाईल घेवून देण्याची मागणी केली. मात्र, आजीने मोबाईल न घेता पेन्शनची रक्कम घराच्या वीजबिलासाठी वापरली. आजीच्या या निर्णयावर आदित्य चिडला. चिडलेल्या आदित्यने घरातील स्वयंपाक खोलीत जाऊन साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आज (27 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार संदिप मोकाशी यांनी दिली.

मृत आदित्य इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता. त्याने केवळ मोबाईलच्या हट्टापायी आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा :

खर्च पेलत नसल्याने दोन वेळा लग्न मोडले, वडिलांवर कर्जाचा डोंगर नको म्हणून शेतकरी कन्येची आत्महत्या

गैरहजेरीच्या परवानगीसाठी कॉलेजला गेला आणि वर्गातच गळफास घेतला, नगरच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ

आईसह दोन मुलं विहिरीत आढळले, जळगावातील धक्कादायक घटना

व्हिडीओ पाहा :

Suicide of a 15 year old boy for demand of Mobile in Purandar Pune

Follow Us
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन