AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खर्च पेलत नसल्याने दोन वेळा लग्न मोडले, वडिलांवर कर्जाचा डोंगर नको म्हणून शेतकरी कन्येची आत्महत्या

लग्नखर्चाच्या धास्तीने एका शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Daughter Died By Suicide) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली.

खर्च पेलत नसल्याने दोन वेळा लग्न मोडले, वडिलांवर कर्जाचा डोंगर नको म्हणून शेतकरी कन्येची आत्महत्या
शैलेश बसवेश्वर पाटील या शेतकऱ्याने 15 मार्चला आत्महत्या केली होती.
| Updated on: Feb 25, 2021 | 3:58 PM
Share

औरंगाबाद : लग्नखर्चाच्या धास्तीने एका शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Daughter Died By Suicide) केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव या गावात ही घटना घडली. वैशाली राधाकिशन जाधव, असं आत्महत्या केलेल्या शेतकरी कन्येचं नाव आहे (Farmer Daughter Died By Suicide).

घरची परिस्थिती हलाखीची, लग्नखर्च पेलत नसल्यामुळे दोन वेळा लग्न मोडले. लग्नासाठी वडिलांवर कर्जाचा डोंगर नको, म्हणून या मुलीने आत्महत्या केली. तशी सुसाईड नोटही तिने लिहून ठेवली आहे. तिने घरातील पाईपला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (24 फेब्रुवारी) पहाटे चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडगाव येथील एका तरुणीने राहत्या घरात बुधवार पहाटे चार वाजता ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, घटनास्थळी दाखल होऊन सदर तरुणीला खाली उतरुन औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, त्या ठिकाणी तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी  लिहून ठेवली होती. “माझ्या वडिलांची परिस्थिती अंत्यत गरीब आहे. त्यामुळे माझे दोन वेळेस जुळलेलं लग्न मोडून गेले. त्यामुळे गरीब वडिलांना यांचा मनस्ताप सहन करावा लागला. पुढे माझे लग्न करायचे तर कर्ज काढून वडिलांना करावे लागणार. त्यामुळे मी माझे जीवन संपवित आहे”, असे चिट्ठीत लिहून या तरुणीने आपलं जीवन संपवलं.

या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Farmer Daughter Died By Suicide

संबंधित बातम्या :

आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली, अनवधानाने मुलगा-बहिणीचा मृत्यू

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आत्महत्येचे, गुन्हा मानूनच तपास सुरु : पोलीस महासंचालक

गर्भपात आणि आत्महत्या केलेली पूजा एकच, संजय राठोडांची चौकशी झालीच पाहिजे : चित्रा वाघ

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.