AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prakash Ambedkar: सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने मोठी खळबळ, वडेट्टीवार यांचाही तोच सूर

Prakash Ambedkar on Supriya Sule: महापालिका निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी मोठा बॉम्ब टाकला. पुण्यात काँग्रेस आणि वंचित यांची युती तुटल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत दिले. शरद पवार धक्कातंत्र देतील असे संकेत दिले आहेत.

Prakash Ambedkar: सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री; प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने मोठी खळबळ, वडेट्टीवार यांचाही तोच सूर
प्रकाश आंबेडकर, सुप्रिया सुळे, शरद पवार
| Updated on: Dec 30, 2025 | 2:20 PM
Share

Congess-Vanchit Yuti depart: महापालिका निवडणुकीचा अभुतपूर्व गोंधळ दिसून आला. 12 हून अधिक ठिकाणी महायुती फिसकटली. भाजप आणि शिवसेना या ठिकाणी एकमेकांविरोधात लढणार आहे. तर दुसरीकडे पुण्यात काँग्रेस आणि वंचित युती तुटली आहे. पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटली आहे.पुण्यातल्या पाटीलकीमुळे आमचे आणि काँग्रेसची फिस्कटल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांची दिली. पुण्यात वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर लढण्याचा आदेश प्रकाश आंबेडकर यांनी दिला.जागा वाटपावरून काँग्रेस आणि वंचितची युती फिसकटली आहे. त्यातच माध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी अजून एक बॉम्ब टाकला. त्यामुळे चर्चा रंगली आहे.

सुप्रिया सुळे लवकराच केंद्रात मंत्री

पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटली.पुण्यातल्या पाटीलकीमुळे आमचे आणि काँग्रेसची फिस्कटल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.पुण्यात वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर जाण्याचा प्रकाश आंबेडकर यांनी आदेश दिला.मुंबईत आमच्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे जर कोणी नाराज असेल तर आम्हाला काही देणंघेणं नाही. आमच्यासाठी तो पक्ष महत्त्वाचा आहे,नेते नाहीत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील असे भाकीतही आंबेडकर यांनी केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार का, शरद पवार हे धक्कातंत्र वापरणार का, अशी चर्चा रंगली आहे.

शरद पवार NDA मध्ये जाणार

तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यानुसार, उद्योगपती गौतम अदानी हे नुकतेच बारामतीला येऊन गेले. अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार हे लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA मध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लोकसभेत खासदारांची गरज आहे. शरद पवार यांच्याकडेही आमदार कमी आहेत. पुण्यात दोन्ही गट एकत्र आल्याने एकत्रीकरणाची पहिली पायरी गाठल्याचे स्पष्ट होत आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. पुण्यातील ही युती स्थानिक स्तरावरची तात्पुरती युती ठरते का याकडे सर्वांचे लक्ष आहे, राज्यातील मनपा निवडणुकीच्या धुरळ्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी असे वक्तव्य केले आहे.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.