AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार, स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून खुला

स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून खुला होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार, स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून खुला
| Updated on: Dec 29, 2020 | 8:59 AM
Share

पुणे : स्वारगेट ते कात्रज चौकापर्यंतच्या गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बीआरटी मार्गातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या असून उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसांत पूर्ण करणार आहोत. त्यामुळे स्वारगेट-कात्रज हा बीआरटी मार्ग येत्या 1 जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. (Swargate-Katraj BRT Road Will open Form 1 january)

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी स्वारगेट ते कात्रज यादरम्यानच्या बीआरटी मार्गाची पाहणी महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्या समवेत करुन या मार्गाचा ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर आढावा घेतला. कामाच्या पाहणीनंतर बीआरटी सुरु करण्याची घोषणा महापौर मोहोळ केली. पाहणीवेळी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, आदी उपस्थित होते.

स्वारगेट-कात्रज बीआरटीच्या कामाची निविदा 2016 साली काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने 2018 साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र आचारसंहिता आणि या रस्त्यावररील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामे, यामुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला. आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून उरलेली काही कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे हा मार्ग खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, तांत्रिक प्रक्रिया आणि विविध बाबींमुळे हे काम लांबले असले तरी आता त्यातील त्रुटी दूर केल्या आहेत. काम योग्यरित्या पूर्ण झाले असून 1 जानेवारीपासून हा मार्ग खुला करण्यात येणारआहे. या मार्गाचा फायदा या भागातील नागरिकांना उत्तमरीत्या होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

(Swargate-Katraj BRT Road Will open Form 1 january)

हे ही वाचा :

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

कंटेनमेंट झोनबाहेर फिरायला जाताय? सरकारची ही नियमावली तुमच्यासाठी

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.