खडकवासल्यात भर रस्त्यात कोयते घेऊन फिरणारी टोळी जेरबंद; कोयते घेऊन माजवली दहशत

खडकवासल्यात भर रस्त्यात कोयते घेऊन फिरणारी टोळी जेरबंद; कोयते घेऊन माजवली दहशत
सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर
Image Credit source: TV9

खडकवासमध्ये सध्या दहशत माजवण्याचे प्रकार वाढत असून गँगवारच्या घटना घडत आहेत. आजही खडकवासमध्ये भर रस्त्यात कोयते हातात घेऊन फिरणाऱ्या टोळीला पोलिसांनी साफळा रचून जेरबंद केले. गुन्हेगारीत सध्या गटागटातील वाद उफाळून येत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

Mar 21, 2022 | 10:37 PM

पुणेः खडकवासल्यात (khadkwas) सध्या दहशत माजवण्याचे प्रकार वाढत असून गँगवारच्या (Gangnwar) घटना घडत आहेत. आजही खडकवासमध्ये भर रस्त्यात कोयते हातात घेऊन फिरणाऱ्या टोळीला पोलिसांनी साफळा रचून जेरबंद केले. गुन्हेगारीत (Crime) सध्या गटागटातील वाद उफाळून येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. गटागटातील वादामुळे आणि वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतून वेगवेगळ्या मार्गावरद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भर रस्त्यात आणि वर्दळीच्या ठिकाणी खडकवासमध्ये हातात कोयते घेऊन दमदाटी करण्याचा प्रयत्न करुन काही तरुणांना मारहाण करण्यात आली. यावेळी दोन गटात मारामारी झाल्यानंतर काही वेळातच दहशत माजवणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकवासल्यात गटागटात वाद होण्याचे प्रकार सध्या वाढू लागले आहेत. त्यामुळे दोन गटातील वादाचे पर्यावसन मारामारीत होत आहे. दोन गटात वर्चस्व निर्माण करण्यासाठी हातात कोयते, काठ्या घेऊन भर रस्त्यात अथवा बाजारपेठेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अधीही परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काही तरुणांकडून केला गेला होता. त्यानंतर पोलिसांनी काही गटांवर कारवाईही केली होती मात्र आता पुन्हा गटबाजी निर्माण करुन दहशत निर्माण केला जात आहे.

गटबाजीतून हाणामारी

खडकवासल्यात काही तरुणांमध्ये गटबाजीतून हाणामारी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी साफळा रचला होता. त्यानंतर काही वेळातच काही तरुण हातात कोयते आणि काठ्या घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करत वाद घालत होते. त्यावेळी पोलिसांनी या दहशत निर्माण करणाऱ्यांपैकी चौघांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे पुन्हा एकदा खडकवासमध्ये दहशत आणि गुंडागर्दीची प्रकरणांनी डोके वर काढले आहे. गुन्हेगारींच्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना याचा त्रास होत आहे.

नागरिक त्रस्त

गटबाजीतून होणाऱ्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. खडकवासल्यामधील बाजारपेठ, भाजीमंडई अशा ठिकाणी दोन दोन गटातून होणाऱ्या हाणामारीमुळे आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे खडकवासमधील नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कोयते घेऊन फिरणाऱ्या टोळ्यांमुळे महिला, लहान मुले यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांचा पीडितेवर दबाव? चित्रा वाघ यांचा सरकारवर घणाघात, तर महिला आयोगाचे अहवाल सादर करण्याचे आदेश

रघुनाथ कुचिक प्रकरणाला वेगळेवळण ; कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार ; काय केली मागणी?

Parth pawar | पार्थ पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची शिवसेनेकडे विशेष मागणी ; सोशल मीडियापोस्ट व्हायरल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें