रघुनाथ कुचिक प्रकरणाला वेगळेवळण ; कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार ; काय केली मागणी?

रघुनाथ कुचिक प्रकरणाला वेगळेवळण ; कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार ; काय केली मागणी?
Rupali chakankar

चित्रा वाघ आणि पीडित मुलगी संगनमताने बदनामी करत आहे, अशी तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश आहेत.

योगेश बोरसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 21, 2022 | 7:23 PM

पुणे-  शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराच्या आरोपामुळे चर्चेत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस (Police) दिरंगाई करत असल्याचा आरोप केला होता. तसेच पीडित मुलीला कुचिक यांच्याकडून धमकावले जात असल्याचा आरोपही वाघ यांनी केला आहे. मात्र चित्रा वाघ यांच्या विरोधात शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या मुलीने गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्रा वाघ (chitra wagh) यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटनेची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहेत मुलीचे आरोप

चित्रा वाघ आणि पीडित मुलगी संगनमताने बदनामी करत आहे, अशी तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश आहेत. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात कुचिक यांच्या मुलीने महिला आयोगाकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

 रुपाली चाकणकर यांची वाघ यांच्यावर टीका

काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचिक यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आला होता. सदर आरोपानंतर रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण लागले असल्याचं समोर आले आहे.तर, चित्रा वाघ या पोलिसांवर खोटे आरोप करत आहे, असं म्हणत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी  वाघ यांच्यावर टीका केली केला आहे.

शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय ‘या’ दोघांचं भांडण, Beedमधला Video viral

Lucknow Super Giants IPL 2022: ‘त्या’ बांग्लादेशी गोलंदाजामुळे धोनीचा अपमान झाला होता, आता गौतम गंभीर त्यालाच संधी देणार

Congress In Rajya Sabha: काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात?; काय आहे नेमकं गणित?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें