Lucknow Super Giants IPL 2022: ‘त्या’ बांग्लादेशी गोलंदाजामुळे धोनीचा अपमान झाला होता, आता गौतम गंभीर त्यालाच संधी देणार

Lucknow Super Giants IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धा सुरु होण्याआधीच लखनौ सुपर जायंट्सला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज मार्क वुडला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएमधून माघार घ्यावी लागली आहे.

Lucknow Super Giants IPL 2022: 'त्या' बांग्लादेशी गोलंदाजामुळे धोनीचा अपमान झाला होता, आता गौतम गंभीर त्यालाच संधी देणार
गौतम गंभीर-एमएस धोनी Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 6:18 PM

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धा सुरु होण्याआधीच लखनौ सुपर जायंट्सला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज मार्क वुडला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएमधून माघार घ्यावी लागली आहे. मार्क वुडच्या कोपराला दुखापत झाली आहे. इंग्लंडच्याच जोफ्रा आर्चरला झालेल्या दुखापतीसारखीच ही एल्बोची दुखापत आहे. मार्क वुडला लखनौने तब्बल 7.5 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. तोच लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) गोलंदाजी चमूचं नेतृत्व करणार होता. वुडची दुखापत लखनौला खूपच महाग पडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार लखनौ संघाने मार्क वुडचा पर्याय शोधला आहे. लखनौ सुपर जायंट्स लवकरच बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद (Taskin Ahmed) बरोबर करार करु शकते. तस्किन अहमद आयपीएलमध्ये खेळलेला नाही. यंदा या स्पर्धेत त्याच्या खेळण्याची शक्यता जास्त आहे.

गंभीरला तस्किन अहमदमधली कुठली गोष्ट आवडली?

लखनौ टीमचे मार्गदर्शक गौतम गंभीर तस्किन अहमदपासून खूपच प्रभावित आहेत. वेगवान गोलंदाजी बरोबर चेंडूला बाहेर काढण्याची त्याची चांगली क्षमता आहे. कालेन कांथ वेबसाइटनुसार, गौतम गंभीरने रविवारी ढाक्याला फोन फिरवून तस्किन अहमदला लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळण्यासाठी निमंत्रण दिले.

तस्किन अहमद निमंत्रण स्वीकारणार?

तस्किन अहमदने आयपीएल 2022 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सकडून खेळावे अशी गौतम गंभीरची इच्छा आहे. तस्किनने ऑफर स्वीकारली, तर त्याला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेतून आपले नाव मागे घ्यावे लागेल. तस्किन अहमद सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजमध्ये खेळत आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 33 सामन्यात त्याच्या नावावर 23 विकेट आहेत. तस्किन अहमदन लखनौ सुपर जायंट्सच्या या ऑफरवर विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे.

तस्किन अहमदच्या हातात धोनीचं मुंडकं असलेला फोटो 

2016 मध्ये भारत-बांग्लादेशमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सीरीजमध्ये मोठा वाद झाला होता. तीन सामन्यांची ही वनडे सीरीज बांग्लादेशने 2-1 ने जिंकली होती. या सीरीजमध्ये तस्किनने चांगली कामगिरी केली होती. या विजयानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. यात तस्किन अहमदच्या हातात धोनीचं मुंडक दाखवलं होतं.

बांग्लादेशी चाहत्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या फोटोवरुन भारतीय चाहत्यांनी बांग्लादेशला बरचं सुनावलं होतं. तस्किन अहमदने या सीरीजमध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती. पण बांग्लादेशी चाहत्यांच्या चुकीमुळे तस्कीन अहमद ट्रोल झाला होता.

Non Stop LIVE Update
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय
२०२४ ला भाजपपासून भारताला मुक्ती मिळणार, संजय राऊत यांची जहरी टीका काय.