TET Exam Scam : अभिषेक सावरीकरनं टीईटीचे मार्क बदलण्यासाठी 5 कोटी दिले, आश्विनकुमारचा दावा; पोलिसांची माहिती

शिक्षक पात्रता परिक्षेतील (TET exam Scam) गैरव्यवराहारमधील नव्या गोष्टी समोर येत आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासात टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाला होता.

TET Exam Scam : अभिषेक सावरीकरनं टीईटीचे मार्क बदलण्यासाठी 5 कोटी दिले, आश्विनकुमारचा दावा; पोलिसांची माहिती
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : शिक्षक पात्रता परिक्षेतील (TET exam Scam) गैरव्यवराहारमधील नव्या गोष्टी समोर येत आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासात टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाला होता. 2018 च्या टीईटी परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी पाच कोटींचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरिकरने (Abhishek Sawarikar) पाच कोटी रुपये दिल्याचा जी ए सॉफ्टवेअर (GA Software) च्या अश्विनीकुमार यानं केलाय. पोलिसांच्या तपासात आश्विन कुमार यानं दिल्याची माहिती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयात माहिती दिली.

सावरीकरने 5 कोटी दिले

टीईटी 2018 च्या परीक्षेत सुमारे 600 ते 700 विद्यार्थ्यांचे मार्क बदलण्यासाठी अभिषेक सावरिकर ने पाच कोटी रुपये दिल्याचा दावा जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमारनं केलाय.

आश्विन कुमारला बंगळुरुतन अटक

जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला 20 ते 21 डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता.

लखनऊमधून सौरभ तिवारीला अटक

पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणण्यात आलं आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

VIDEO : खतरनाक व्हिडीओ! 6 सिंहांसह महिलेची जंगलात सवारी, व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणाले हा निव्वळ वेडेपणा…

Bhujbal|सर्वोच्च नेत्यांना महापालिका निवडणूक एकत्र लढवायचीय, पण…भुजबळ नेमकं काय म्हणतायत?

Pune Police said Ashwinkumar accept in investigation Abhishek Sawarikar gave five crore during TET exam 2018

Published On - 12:12 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI