AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election | पिंपरी चिंडवडमध्ये भाजपला तिसरा धक्का! आता तुषार कामठेंचा नगरसेवक पदाचा राजीनामा

यापूर्वीही भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपाला रामरामकरत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.  

PCMC Election | पिंपरी चिंडवडमध्ये भाजपला तिसरा धक्का! आता तुषार कामठेंचा नगरसेवक पदाचा राजीनामा
Corporator Tushar Kamthe
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 2:51 PM
Share

पिंपरी – आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा(Pimpri Chinchwad Municipal Corporation) प्रभाग रचना प्रारूप आरखडा नुकताच जाहीर झाला. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसून आली आहेत. भारतीय जनता पक्षाला आठवडा भारत तिसरा धक्का बसला आहे. भाजपचे (BJP) पिंपळे निलख भागाचे नगरसेवक तुषार कामठे(Corporator Tushar Kamthe) यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पिंपरतील भाजपला लागलेल्या गळतीबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपाला रामरामकरत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. त्यानंतर चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.

राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

भाजपचे पिंपळे निलख भागाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील नगरसेवक पदाचा राजीनामा देत असून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळं तुषार कामठे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फलक लावून कामठे यांनी तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर स्थानिक राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ह्या आधी भाजप च्या मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे, पिंपळे गुरव मधील चंदा लोखंडे आणि आता तुषार कामठे असे तीन धक्के सत्ताधारी भाजपला झाला आहे.

गळतीचे मुख्य कारण

पिंपरी महदये भाजपाला लागलेल्या गळतीचे मुख्य कारण काय असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे. पक्ष सोडण्याचं निर्णय घेण्यामागे नेमका पक्ष कारणीभूत आहे का? नव्या तयार झालेली प्रभाग रचना. आपला मतदार संघ बांधून ठेवण्यासाठी तसेच मजबूत करण्याच्या दृष्टी कोनातून ही पावले उचलली जात आहेत का? हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

शेतीच्या जोडव्यवसयांना सरकारचे पाठबळ, पायाभूत सुविधा अन् योजनांचाही मिळणार लाभ

नवाब मलिकांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला, ईडीचे अधिकारी चौकशी करण्याची शक्यता

Russia Ukraine Crisis: युक्रेनच्या 10 शहरांवरती रशियाचा बॉम्ब हल्ला, 300 लोकांचा मृत्यू

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.