AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांचं आयोजन, एक धाराशिव तर दुसरी रंगणार पुण्यात, नेमकं काय कारण!

Maharashtra Kesari 2023 : मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरीचं आयोजन पुण्यात केलं गेलं आहे. यंदा दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. एक पुण्यात दुसरी कुठे होणार ते जाणून घ्या.

यंदा दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धांचं आयोजन, एक धाराशिव तर दुसरी रंगणार पुण्यात, नेमकं काय कारण!
| Updated on: Nov 04, 2023 | 4:52 PM
Share

पुणे : महाराष्ट्र केसरी 2023 66 वी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडणार आहे. पुण्याजवळ फुलगाव येथे जंगी कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. तीन दिवस या थरारारा बाकी असून 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर यामध्ये स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आहे. पोरांनी वर्षेभर घेतलेली मेहनत पाहता आयोजकांनी बक्षिसांची खैरात केलेली पाहायला मिळत आहे. महिंद्रा थार आणि ट्रॅक्टरसह इतर बक्षीस विजेत्यांना मिळणार आहेत.

पुण्यातील फुलगावमध्ये महाराष्ट्र केसरीचा फड रंगलेला पाहायला मिळणार आहे. ३६ जिल्हे आणि ६ महानगरपालिका असे मिळून ४२ संघ सहभागी होणार आहेत. माती आणि गादी गटांत स्पर्धा होणार असून या थरारामध्ये 840 मल्ल सहभागी होणार आहेत. मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते होणार उदघाटन होणार आहे.

स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. मल्लांसाठी मोठी गोष्ट म्हणजे कुस्तीगीर संघटनेच्या वादात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असून त्यांना दोन्ही ठिकाणी सहभागी होता येणार आहे.

दुसरी ‘महाराष्ट्र केसरी’ धाराशिवमध्ये

दुसरी महाराष्ट्र केसरी धाराशिवमध्ये पार पडणार आहे. 16 ते 20 नोव्हेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी स्कॉर्पिओ एन आणि 1 लाख, 20 बुलेट अशी बक्षिसे असणार आहेत. मागील वर्षीसुद्ध मोठा संभ्रम झालेला पाहायला मिळालेला त्यामुळे तेव्हा मल्लांवर कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. मागील वर्षी पुण्यात कोथरूड येथे शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.