AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरातील वाहतूक होणार ‘स्मार्ट’, ही नवीन प्रणाली करणार वाहतुकीचे नियोजन

Pune smart traffic management : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यासाठी नवीन प्रणाली बसवण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. येत्या पंधरा दिवसांत ही प्रणाली सुरु होणार आहे.

पुणे शहरातील वाहतूक होणार 'स्मार्ट', ही नवीन प्रणाली करणार वाहतुकीचे नियोजन
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 21, 2023 | 1:36 PM
Share

पुणे | 21 जुलै 2023 : पुणे शहरातील वाहतूक हा मोठा गहन प्रश्न आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पुणेकरांना वाहतूक कोंडीचा अनुभव नेहमी येत असतो. यामुळे दोन, चार किलोमीटर आंतर जाण्यासाठी बऱ्याचवेळा तासभर जातो. परंतु आता पुणे शहरातील वाहतूक स्मार्ट होणार आहे. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. त्यासाठी नवीन प्रणाली बसवण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रणाली सुरु होणार आहे.

काय आहे नवीन प्रणाली

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशने स्मार्ट सिग्नल प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली एडटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) म्हणून ओळखली जाते. यामध्ये कॅमेरा आणि सेन्सरचा उपयोग करुन वाहतूक नियंत्रित केली जाते. सिग्नल प्रणालीत विशिष्ट टाईम सेट केलेला असतो. परंतु ATMS प्रणालीत कॅमेरा आणि सेन्सॉरच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रित केली जाईल. ज्या ठिकाणी कमी वाहने असतील त्या ठिकाणी सिग्नल लवकर ग्रीन होईल ज्या ठिकाणी जास्त वाहने आहेत, त्या ठिकाणी जास्त कालावधी ठेवले, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी सांगितले.

नियंत्रण कक्षाची निर्मिती

ATMS प्राणली येत्या १५ दिवसांत ९५ सिग्नलवर बसवली जाणार आहे. त्यासाठी आधी या ठिकाणावरचा डाटा तयार केला आहे. त्यासाठी नियंत्रण कक्ष तयार केले गेले आहे. त्यासाठी सिंहगड रोडवरील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार केला गेला आहे. या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेने ५८ कोटी रुपयांचा निधी स्मार्ट सिटीला दिला आहे.

यांना मिळणार ग्रीन सिग्नल

ATMS प्रणाली रुग्णवाहिका, पोलीस गाडी, अग्निशामन दल यांना सरळ ग्रीन सिग्नल मिळणार आहे. या प्रणालीमुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच प्रदूषणाची पातळी कमी होणार आहे. पुणेकरांचा वेळ वाचणार आहे. कमी वेळेत पुणेकरांना घरी किंवा कार्यालत जात येणार आहे. संपूर्ण शहरात ही प्रणाली ९५  ठिकाणी बसवली आहे. त्यानंतर संपूर्ण शहरात बसवली जाणार आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.