Pune crime | चाकण येथे मालवाहू गाडीच्या धडकेत दोन युवक ठार; एक गंभीर जखमी :अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद

आंबेठाण गावाच्या हद्दीतील राजमुद्रा ट्रेडर्स समोर भरधाव मालवाहू गाडीने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. धडक इतकी भयानक होती की दुचाकीवरील दोघेजण उडून रस्त्यावर पडले. या घटनेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Pune crime | चाकण येथे मालवाहू गाडीच्या धडकेत दोन युवक ठार; एक गंभीर जखमी :अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद
Ambegav accidents
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 2:11 PM

चाकण- पुण्यातील चाकण-आंबेठाण रस्त्यावर कोरेगाव फाटा येथे भरधाव मालवाहू गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. चाकणच्या झित्राईमळा येथील 3 युवक होंडा दुचाकी एम.एच.14  जे.जे. 3172  वरून औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामावर जात असताना ही घटना घडली आहे . घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अशी घडली घटना आंबेठाण गावाच्या हद्दीतील राजमुद्रा ट्रेडर्स समोर भरधाव मालवाहू गाडीने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. धडक इतकी भयानक होती की दुचाकीवरील दोघेजण उडून रस्त्यावर पडले. या घटनेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. केतन माणिकराव धोंडगे (वय.19 वर्षे ) आणि विलास आनंदराव घुले (वय.22वर्षे, ) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील गोरख जकाते अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार असुर आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  घटनेनंतर मालवाहू गाडीच्या चालक राहुल पोपट वाळूंजकर , (मावळ ) घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घटनास्थळावरील नागरिकांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चालकावर म्हाळूंगी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांना कोरोना, मुंबई पोलीस दलात कोविडचा शिरकाव, बडे अधिकारी बाधित

Relationship tips: नात्यामध्ये दुरावा आलाय?, तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी, नातेसंबंध होतील अधिक मजबूत

Bigg Boss 15 : भडकलेली नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला म्हणाली चपलेने मारेल… हे ऐकून बिचकुलेची सटकली आणि मग…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.