Bigg Boss 15 : भडकलेली नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला म्हणाली चपलेने मारेल… हे ऐकून बिचकुलेची सटकली आणि मग…

‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) फिनालेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धकांनी ट्रॉफी जिंकण्यासाठीची तयारी केली आहे आणि एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. पण, हा शो जितका फिनाले जवळ येत आहे, तितकाच चर्चेत येताना दिसत आहे.

Bigg Boss 15 : भडकलेली नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला म्हणाली चपलेने मारेल... हे ऐकून बिचकुलेची सटकली आणि मग...
नेहा भसीन आणि अभिजीत बिचकुले

मुंबई : ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) फिनालेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धकांनी ट्रॉफी जिंकण्यासाठीची तयारी केली आहे आणि एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. पण, हा शो जितका फिनाले जवळ येत आहे, तितकाच चर्चेत येताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, काही माजी स्पर्धक आणि टीव्ही सेलेब्स बिग बॉसच्या घरामधील आपल्या आवडत्या स्पर्धेकाला सपोर्ट करण्यासाठी शोमध्ये आले होते.

अभिजीत बिचकुले आणि नेहा भसीनमध्ये वाद

यावेळी शमिता शेट्टीला सपोर्ट करण्यासाठी नेहा भसीन (Neha bhasin) बिग बाॅसच्या घरामध्ये आली होती. शमिता शेट्टीची बाजू घेत नेहा भसीनने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना चांगलेच धारेवर घेतले. यावेळी नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला (Abhijit bichukale) बोलताना म्हणाली की, पैर की जूती परत जर शमिताला बोललास तर त्याच जूतीने तुला घरात येऊन मारेल…मात्र, हे ऐकून अभिजीत बिचकुलेचा पारा चांगलाच चढला…आणि तो थेट नेहा भसीनला म्हणाला की, जे काही तु बोलली आहेस ते माझ्या भाभींना समजले तर ते तुला टकलेच करतील…हे ऐकल्यावर नेहा भसीन म्हणाली की, तुला बोलण्यातच काही अर्थ नाहीये…

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अभिजीत बिचकुलेचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता अभिजीत आणि नेहामधील हे संभाषण चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. शनिवारच्या वीकेंटच्या वारमध्ये सलमान खानने करण आणि अभिजीतचा चांगला क्लास घेतला. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान उमर रियाजला बोलला की, तू कधीच काही ऐकत नाहीस. वारंवार सांगूनही तू हिंसा केलीस. या अगोदर ही तू बऱ्याच वेळा घरामध्ये हिंसा केलीस. मात्र, त्यावेळी तुला माफ केले. मात्र, यावेळी तू केलेल्या हिंसेवर जनतेने निकाल दिला आहे. उमरशी बोलल्यानंतर सलमानने उमर रियाझला ‘बिग बॉस’मधून बाहेर काढल्याची घोषणा केली.

संबंधित बातम्या : 

मुन्नाभाईने तुरुंगात कागदाच्या पिशव्या बनवून कमावले 500 रुपये, सुटल्यानंतर पैशांचे असे काही केले की ऐकून थक्क व्हाल!

Bigg Boss 15 Shocking | बिग बॉसच्या घरातून धक्कादायक एक्सिट, उमर रियाझ शोमधून बाहेर, रश्मी देसाईला आश्रू अनावर


Published On - 2:01 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI