AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुन्नाभाईने तुरुंगात कागदाच्या पिशव्या बनवून कमावले 500 रुपये, सुटल्यानंतर पैशांचे असे काही केले की ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. संजय दत्तने आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. 1980 दरम्यान अंमली पदार्थांच्या (Drug Addiction) व्यसनामुळे संजय दत्त चर्चेत होता. त्यानंतर 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांच्यावर टाडा खटला (TADA Case) दाखल करण्यात आला होता.

मुन्नाभाईने तुरुंगात कागदाच्या पिशव्या बनवून कमावले 500 रुपये, सुटल्यानंतर पैशांचे असे काही केले की ऐकून थक्क व्हाल!
संजय दत्त
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 12:14 PM
Share

मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. संजय दत्तने आपल्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. 1980 दरम्यान अंमली पदार्थांच्या (Drug Addiction) व्यसनामुळे संजय दत्त चर्चेत होता. त्यानंतर 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांच्यावर टाडा खटला (TADA Case) दाखल करण्यात आला होता. यामुळे संजय दत्तला तुरुंगात जावे लागले होते. संजय दत्तने एका मुलाखतीत तुरुंगात काम करताना 500 रुपये कमावल्याचे सांगितले आहे.

जेलमध्ये असताना 500 रुपयांची कमाई

संजय दत्तला टाडा कोर्टाने बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगात टाकले होते. 2013 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवल्यानंतर संजय दत्तने आत्मसमर्पण केले. 2013 ते 2016 या काळात ते पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात होते. 2018 मध्ये एंटरटेनमेंट की रात सीझन 2 च्या स्पेशल एपिसोडमध्ये संजय दत्त गेस्ट म्हणून आले होते. तुरुंगात जुन्या वृत्तपत्रांपासून कागदी पिशव्या बनवल्या जात होत्या आणि त्यासाठी पैसेही मिळायचे असल्याचे संजय दत्तने सांगितले. मला एका गोणीचे 20 पैसे मिळायचे.

सर्व काही विसरून पुढे जाने हेच महत्वाचे

शोची होस्ट टिस्का चोप्राने तुरुंगात असताना किती पैसे कमावले असा प्रश्न विचारला होता. तेंव्हा याला उत्तर देताना संजय दत्त सांगितले की, मी तिथे असताना सुमारे 400 ते 500 रुपये कमावले होते आणि तुरुंगातून आल्यानंतर ते पैसे मी माझी पत्नी मान्यताला दिले. माझ्यासाठी ते 500 रुपये म्हणजे 5 कोटी रुपये होते. तुरुंगात तुम्ही सकारात्मक मानसिकतेने जगले पाहिजे, असे अभिनेता म्हणाला. कारण तुम्ही दिवसभर बसून विचार करू शकत नाही की माझ्यासोबत असे का झाले. सर्व काही विसरून पुढे जाने हेच महत्वाचे आहे, असेही संजय दत्त म्हणाला.

संबंधित बातम्या : 

Vikram Vedha First Look : बहुचर्चित ‘विक्रम वेधा’तील हृतिकचा फर्स्ट लूक, वाढदिवशी चाहत्यांना मोठे गिफ्ट!

Bob Saget | ‘Full House’स्टार, यूएस कॉमेडियन बॉब सेगेट यांचा मृत्यू , हॉटेलमध्ये सापडला मृतदेह पोलीस म्हणतात …

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.