AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी ढेकणांच्या नादी लागत नाही, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर नाव न घेता हल्ला

Uddhav Thackeray in pune: मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती. कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते. आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. यांनी तो स्टे काढला. त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा. हा विकास नाही. विखार आहे.

मी ढेकणांच्या नादी लागत नाही, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर नाव न घेता हल्ला
उद्धव ठाकरे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 03, 2024 | 1:59 PM
Share

शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शिवसैनिकांचा संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांचे नाव न घेता त्यांना ढेकणांची उपमा दिली. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसेना उबाठामधील वाद रंगणार आहे. यावेळी पुणे शहराचा विकास करताना नदीचा प्रवाह भाजप बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तू राहूच शकत नाही, तुझ्या बंदोबस्त करण्यासाठी मी मैदानात उतरलो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

…एवढ्या कुवतीचा तू नाहीच

बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यात तुमच्यासमोर येतोय. आज मला जाहीर सभा घ्यायची होती. आता लढाई मैदानात होणार आहे. हॉलमध्ये होणार नाही. मी परवा शिवसैनिकांसमोर मी बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. त्यानंतर माझ्या पायाशी कलिंगड ठेवले गेले. काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटाने चिरडले जात आहे. त्यानंतर ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस.

नद्यांचा प्रवाह बंद केला जात आहे…

पुण्यात मुळा मुठा नदी आहे. त्याबाबत व्यंकय्या नायडू आले होते. त्यांनी मुळा मुठा हे काय नाव आहे. व्यंकय्या नाव ठेवायचं का की मोदी नदी म्हणायचे का?. त्यांनी नद्यांची नावे बदलायला सांगितली. नावं तर बदलू शकत नाही. पण त्यांनी प्रवाह बदलला. पुण्यात नाईक बेट आहे. या नाईक बेटाचे दोन्ही बाजूने प्रवाह बंद केला. प्रवाह बंद करून घरे बांधली. मग नदी का घुसणार नाही इकडे तिकडे. मला पुण्याचा शाश्वत विकास करायचा आहे.

आपण रस्त्यावर उतरले पाहिजे

मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती. कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते. आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. यांनी तो स्टे काढला. त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा. हा विकास नाही. विखार आहे. म्हणूनच आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यासाठी तू राहशील किंवा मी राहील. तू विकासाच्या नावाखाली वाट लावली. त्यामुळेच आम्ही बोलत आहोत.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना