पुणेकरांना लागली बिर्याणीची चटक; शहरातील बिर्याणी उपहारगृहांमध्ये लक्षणीय वाढ

Biryani | हैदराबादी बिर्याणी, तंदूर बिर्याणीसह विविध प्रकारची बिर्याणी या उपाहारगृहांमध्ये, ‘बिर्याणी जॉईंट्स’मध्ये उपलब्ध होते. त्यामुळे बिर्याणी देणाऱ्या नामांकित उपाहारगृहांसह आता छोटय़ा उपाहारगृहांमध्येही किफायतशीर दरात बिर्याणी मिळू लागली आहे.

पुणेकरांना लागली बिर्याणीची चटक; शहरातील बिर्याणी उपहारगृहांमध्ये लक्षणीय वाढ
पुणेकरांना बिर्याणीची चटक

पुणे: सुवासिक मोकळ्या भातासह शिजलेल्या भाज्यांची किंवा चिकन, मटणाची बिर्याणी (Biryani) घेण्यासाठी उभे असलेले किंवा घेऊन खाणारे ग्राहक हे चित्र पुण्यात सध्या सर्रासपणे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये शहरभरात बिर्याणी देणाऱ्या हॉटेलांचे किंवा छोटय़ा ‘बिर्याणी जॉईंट्स’चे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातील काही ठराविक हॉटेल्सच बिर्याणीसाठी प्रसिद्ध होती. मात्र, अलीकडे हे चित्र बदलले आहे. शहरभरात ठिकठिकाणी बिर्याणी देणारी हॉटेल, बिर्याणी जॉईंट तयार झाल्याचे दिसून येत आहे. हैदराबादी बिर्याणी, तंदूर बिर्याणीसह विविध प्रकारची बिर्याणी या उपाहारगृहांमध्ये, ‘बिर्याणी जॉईंट्स’मध्ये उपलब्ध होते. त्यामुळे बिर्याणी देणाऱ्या नामांकित उपाहारगृहांसह आता छोटय़ा उपाहारगृहांमध्येही किफायतशीर दरात बिर्याणी मिळू लागली आहे. खवय्येही या बिर्याणीचा आस्वाद घेताना दिसून येतात.

आधी म्हणाले मांसाहार करा, आता थेट चिकन बिर्याणी आणि उकडलेली अंडी वाटली, आमदार संजय गायकवाडांनी करुन दाखवलं

गारवा बिर्याणीचे भागीदार श्रेयस उभे म्हणाले, की माझे बंधू राजेंद्र शिंदे यांच्यासह जानेवारी 2020 मध्ये सदाशिव पेठेत बिर्याणीचे छोटेखानी हॉटेल सुरू केले. बिर्याणी आतापर्यंत ठराविक ठिकाणी मिळायची आणि ती सर्वानाच परवडण्यासारखी नव्हती. त्यामुळे सर्वांना परवडणारी बिर्याणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

करोनाकाळात बिर्याणीला मोठी मागणी आहे. बिर्याणीमधून प्रथिने, कर्बोदके आदी घटक मिळत असल्याने बिर्याणी आरोग्यदायीही आहे. गेल्या दीड वर्षांत शहराच्या विविध भागात शाखा सुरू केल्या आहेत. पूर्वी छावणी परिसरात असलेले कॅफे आता मध्यवर्ती शहरात आणि उपनगरांमध्ये मोठय़ा प्रमाणात झाले आहेत.या कॅफेंमधून बर्गर, मोमो, विविध प्रकारचे रोल्स हे खाद्यपदार्थ चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.

संबंधित बातम्या:

एसपीची फुकट बिर्याणी महागात, पुण्यातील महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

मांसाहारप्रेमी पाहुण्यांसाठी स्वादिष्ट पर्याय… मटण दम बिर्याणी

OMG: जगातील सर्वात महाग बिर्याणी! एक प्लेटसाठी तब्बल 20 हजार रुपये मोजावे लागणार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI