Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या आमदाराची नाराजी, मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार

आमच्या मतदारसंघातील कामं रखडली आहे. अशा तक्रारी गेल्या काही दिवसात अनेक अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील आमदार करताना दिसून आले. आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने आपल्या मतदारसंघातील कामं रखडल्यानवरून थेट नाराजी व्यक्त केलीय.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या आमदाराची नाराजी, मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार
विधान परिषदेच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या आमदाराची नाराजीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:31 PM

पुणे : काही  दिवसांपूर्वीच राज्यात राज्यसभेच्या निवडणुका (Rajyasabha Election) पार पडल्या. यात महाविकास आघाडीला एका जागेचा फटका सहन करावा लागला. काही आमदारांनी दगा दिल्यामुळेच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडी सतर्क झाली. मात्र आता ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एका आमदाराची उघड नाराजी बाहेर आली आहे. मुख्यमंत्री भेटत नाही, वेळ देत नाही. आमच्या मतदारसंघातील कामं रखडली आहे. अशा तक्रारी गेल्या काही दिवसात अनेक अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील आमदार करताना दिसून आले. आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने आपल्या मतदारसंघातील कामं रखडल्यानवरून थेट नाराजी व्यक्त केलीय. तशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. त्यामुळे आता पुन्हा राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराची तक्रार काय?

राज्यसभा निवडणुकीत मतदारसंघातील काम न झाल्यानं खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. खेडमधील काम मार्गी लावा अशी विनंती उपमुख्यमंत्र्या़नी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्थानिक शिवसेना नेते काम होऊ देत नसल्याचाही या राष्ट्रवादी आमदाराने आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीआधी काम करा असा इशारा दिलीप मोहिते यांनी आधीच दिला होता. मात्र दोन तीन दिवसांत काम मार्गी लागतील अशी माहिती आता दिलीप मोहिते यांनी दिली आहे.

विधान परिषदेसाठीही जोरदार तयारी

दुसरीकडे महाविकास आघाडीने विधान परिषदेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच 18 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक पार पडणार आहे. अजित पवार आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आलीय. या बैठकीतही काही आमदारांच्या समस्या, तक्रारी येण्याची शक्यता आहे. तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कसे नियोजन करायचे याच्या सूचना या बैठकीत आमदारांना दिल्या जातील. मात्र आता आमदारांची नाराजी शांत करण्यासाठी महाविकास आघाडीलाही ठोस पाऊलं उचलावी लागणार आहे. कारण गेल्या अडीच वर्षात स्थानिक लेव्हलचा संघर्ष महाविकास आघाडीत अनेकदा दिसून आला आहे. अनेक आमदार, मंत्री आणि नेत्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या योजनावरून, फोडाफोडीच्या राजकारणावर आणि निधीवरून आल्या आहेत. आता पुन्हा तीच समस्या महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीच्या तोंडवर भेडसावते आहे.

Non Stop LIVE Update
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.