रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा प्रकल्पात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल

रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. रात्री 8च्या सुमारास ही आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा प्रकल्पात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल

पुणे : हडपसर परिसरातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. रात्री 8च्या सुमारास ही आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत. आग लागली की लावली असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.(Waste project on fire at Ramtekdi industrial estate in Pune)

2 दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटला आग

दोनच दिवसांपूर्वी हडपसरनजिकच्या मांजरी परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग लागली होती. दुर्दैवानं 5 कामगारांचा मृत्यू झालाय. 21 जानेवारीला दुपारी लागलेल्या या आगीवर जवळपास तीन तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कोव्हिशील्ड या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी दोन वाजता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरत गेले. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही

जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम

ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

मुक्ता टिळक यांना घातपाताचा संशय

पुण्याच्या माजी महापौर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. “दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही, त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटतंय. कारण ज्या ठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची मला शंका आहे” असा संशय मुक्ता टिळक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

adar poonawalla on Serum Institute Fire: ‘सीरम’च्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान: आदर पुनावाला

सीरमची आग अपघात की घातपात?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Serum Institute Fire : सीरम इन्स्टिट्यूटमधील आग पुन्हा भडकली, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Waste project on fire at Ramtekdi industrial estate in Pune

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI