मी आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, पंकजा यांनी मांडलेली भूमिका हीच भाजपची भूमिका: फडणवीस

दिवंगत गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांनीच आम्हाला घडवलं. मी आणि भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत. (devendra fadnavis)

मी आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, पंकजा यांनी मांडलेली भूमिका हीच भाजपची भूमिका: फडणवीस
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 4:34 PM

पुणे: दिवंगत गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांनीच आम्हाला घडवलं. मी आणि भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांनी आज जी भूमिका मांडली तीच भाजपची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. (we are gopinath munde’s activist, says devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. पुण्यात त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.

तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का?

ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतुर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासंदर्भात 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही, असं ते म्हणाले. इम्पिरीकल डेटा गोळा करणे हे 4 महिन्यांचे काम आहे. हे काम सहज होऊ शकणारे आहे. मी हेच म्हटले की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवितो. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो, असंही ते म्हणाले.

सहकार खात्याचा महाराष्ट्राला फायदाच

केंद्रात सहकार खाते नव्हते, तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता 70 वर्षांनी पहिल्यांदा सहकार खाते तयार झाले, तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध?, असा दोन्ही काँग्रेसवर हल्ला चढवतानाच या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. केंद्रीय मंत्री अमित शाह राजकारणात येण्यापूर्वी सहकारात होते. गुजरातमध्ये सहकारात त्यांनी केलेले काम अतिशय मोठे आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे खाते त्यांच्याकडे गेले, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (we are gopinath munde’s activist, says devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

मुख्य निवडणुका होण्याआधीच इम्पिरीकल डेटा पूर्ण करा, नव्या मंत्र्यांकडून ओबीसींच्या खूप अपेक्षा: पंकजा मुंडे

एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी; पंकजा मुंडे म्हणाल्या…

मोठी बातमी, इफकोचा नॅनो यूरीया राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार, इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसेंचं आवाहन

(we are gopinath munde’s activist, says devendra fadnavis)

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.