AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता त्यांना संरक्षणाची गरज, सरकारने त्यांची काळजी घ्यावी; संदीप देशपांडे यांचा इशारा

ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांचा दोष नाही. ज्यांनी त्यांना सांगितलं ते समोर आले पाहिजे. ठाकरे गटाला लोकांना वापरून घेण्याचीच सवय आहे. त्यांचा इतिहास काही नवा नाही. मी कुणाचंही नाव घेणार नाही.

आता त्यांना संरक्षणाची गरज, सरकारने त्यांची काळजी घ्यावी; संदीप देशपांडे यांचा इशारा
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 04, 2023 | 1:39 PM
Share

मुंबई : माझ्यावर कुणी हल्ला केला हे मला माहीत आहे. आम्हाला त्यांची नावं कळली आहेत. ज्यांना संरक्षणाची गरज आहे. त्यांना द्या. माझ्यावर हल्ला ज्यांनी केला त्यांना संरक्षण द्या. सरकारने त्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी, असा सूचक इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला फोन केला होता. त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली. तसेच मला संरक्षण दिलं. पण मी कुणाला घाबरत नाही. कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही. त्यामुळे आम्हाला संरक्षणाची गरज नाही. म्हणूनच मी संरक्षण नाकारलं आहे, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी कुणावरही थेट आरोप केले नाहीत.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना मी कोरोनाच्या घोटाळ्याचं पत्रं दिलं आहे. कोरोनाच्या काळातील घोटाळ्याची कॅग मार्फत चौकशी व्हायला हवी होती. होत नसेल तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी होऊ नये म्हणून हा हल्ला झाला असेल तर पुढच्या आठवड्यात पुन्हा पालिका आयुक्तांकडे जाणार आणि घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहे, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

हल्लेखोरांचा दोष नाही

ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांचा दोष नाही. ज्यांनी त्यांना सांगितलं ते समोर आले पाहिजे. ठाकरे गटाला लोकांना वापरून घेण्याचीच सवय आहे. त्यांचा इतिहास काही नवा नाही. मी कुणाचंही नाव घेणार नाही. कारण तपास सुरू आहे. पोलीसांवर विश्वास आहे. ते चौकशीतून सर्व बाहेर आणतील. राजकारणाचा चिखल झाला आहे. तो दिसत आहे. 48 तास आधी बाळा कदमला अटक झाली. तो बाळा कदम कोण आहे? कुणाचा माणूस आहे? या मागे कुणाचा हात आहे? हे सर्वांना माहीत आहे, असंही ते म्हणाले.

वेळ आल्यावर बोलेन

मला हल्लेखोरांनी जे सांगितलं. मी जे ऐकलं ते मी पोलिसांना सांगितलं. तपासात अडथळा नको म्हणून मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. पोलिसांनी बाहेर काही विधान न करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मी काही बोलत नाहीये. वेळ आल्यावर मी सांगेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हल्लेखोर पळून गेले

काल सकाळी मी फिरत होतो. मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात आलो होतो. तेव्हा पाठीमागून कुणी तरी स्टम्पने हल्ला केला. मला वाटलं चेंडू लागला. जेव्हा मी मागेवळून पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर वार करण्याचा हल्लेखोराने प्रयत्न केला. त्यामुळे प्रसंगावधान राखून मी तात्काळ हातावर वार झेलला. त्यानंतर दुसऱ्याने माझ्या पायावर हल्ला केला. त्यामुळे मी खाली पडलो. तेवढ्यात लोकं धावून आले. तेव्हा लोकांनाही या हल्लेखोरांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. पण लोकं हल्लेखोरांच्या अंगावर धावून गेल्याने हल्लेखोर पळून गेले, असं त्यांनी सांगितलं.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.