AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मुख्यमंत्र्यासह अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा कशासाठी?

आम्ही नक्की अयोध्येला जाणार आहोत. मनात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. मंदिर बनवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता, भाजपचा नाही. 2024 ला कुणाला निवडायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. आमच्या लोकांवर कारवाई केली जात आहे. पण महाराष्ट्रातली माती आम्हाला सांगत आहे लढा लढा लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंही ते म्हणाले.

तर मुख्यमंत्र्यासह अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकू; आदित्य ठाकरे यांचा इशारा कशासाठी?
aaditya thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 21, 2024 | 9:36 PM
Share

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 21 जानेवारी 2023 : मुख्यमंत्री आमचं ऐकत नाही, राज्याचं ऐकत नाहीत, महाराष्ट्राचा ऐकत नाहीत, ते फक्त गुजरातचं ऐकतात. हे सरकार पडणार म्हणजे पडणार आणि आपलं सरकार नक्की बसणार. ज्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरून लुटलं त्या सर्वांना जेलमध्ये टाकू, असा इशाराच माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. या लोकांनी राज्याचं राजकारण यांनी गढूळ केलं आहे. राष्ट्रवादीसोबत जायची वेळ आली तर संन्यास घेऊ म्हणणारे लोकं आज राष्ट्रवादीसोबत बसले आहेत. संन्यास घेणार होते त्याचं काय झालं? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज पुण्यात होते. यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अवकाळी पावसासारखं अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आहे. पुण्यात येणारी वेदांता कंपनी या सरकारने घालवली. ही कंपनी पुण्यात राहावी म्हणून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. ही कंपनी राज्यात राहिली असती तर मोठा रोजगार आपल्याला मिळाला असता. पण सरकार बदलून खोके सरकार आलं आणि ही कंपनी गुजरातला गेली. या सरकारने त्या कंपनीला गुजरातला जायला भाग पाडलं. नागपूरमध्ये येणारी एअर बस कंपनी गुजरातमध्ये पाठवली. संभाजी नगरमध्ये येणारा उद्योग गुजरातला पाठवला. एकूण 5 कंपन्यासह फिल्म फेअर अवोर्ड देखील गुजरातला नेला, असा हल्लाच आदित्य ठाकरे यांनी चढवला.

मुख्यमंत्र्यांना 50चा आकडा खूपच आवडतो

गुजरातला वर्ल्ड कप नेला आणि आपण हरलो. जर तुम्ही वानखेडेवर अंतिम सामना खेळवला असता तर आपण जिंकलो असतो. मागच्या वर्षी 2 दिवसात दावोसमध्ये 40 कोटी रुपये खर्च झाले. आता 50 लोक घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांना 50 हा आकडा खूपच आवडतो, असा टोला लगावतानाच दावोसमध्ये जाऊन त्यांनी मज्जा केली. तुम्ही राज्यासाठी काय आणलं ते सांगा, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिलं.

व्हीआयपीची तारीख मिळत नाहीये

पुण्यातले दोन विमानतळ या सरकारने रद्द केले. आज 4 महिने झाले, नवीन इमारत तयार आहे, पण उद्घाटन मात्र झालं नाही. का नवं विमानतळ सुरू झालं नाही? अनेक प्रकल्प तयार आहेत. पण या खोके सरकारला उद्घाटन करायला वेळ नाही. कारण VIP ची तारीख मिळत नाही. शहरं कोलमडत चालली आहेत. राज्यात भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातलं कृषी, उद्योग, शिक्षण आरोग्य सगळं कोलमडले आहे, अशी टीका त्यांनी केली.

आता वित्त खातं कुणाकडे आहे?

आधी ओरडत होते आम्हाला वित्त मिळत नाही, वित्त मिळत नाही. आता वित्त खातं नेमकं कोणाकडे आहे? शेवटी राष्ट्रवादी पवार साहेबांचीच आहे. आमचं सरकार का पाडलं हे या चाळीस चोरांनी सांगावं. आपलं राज्य कुठं जात आहे?

आपलं हिंदुत्व वेगळं

जे पालकमंत्री पद तुम्ही भांडून, लढून मिळवलं होतं ते पालकमंत्री पद तुमचं गेलं. तुम्ही काय केलं?, असा सवाल त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना केला. आपल्या आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. आम्ही जी वचने देतो ती पूर्ण करतो. कर्ज मुक्तीचा निर्णय आपण घेतला. कोव्हिडमध्ये आपण काम केलं. सगळ्याना सुखरूप ठेवलं हे आपलं हिंदुत्व आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.