Weather Alert: पुण्यात घाटमाथ्याच्या परिसरात रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

Pune Rain | वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होऊ शकतो. मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

Weather Alert: पुण्यात घाटमाथ्याच्या परिसरात रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 9:22 AM

पुणे: येत्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून त्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होऊ शकतो. मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. (Heavy Rain expected in Pune)

विदर्भ मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे. विदर्भ मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा के एस होसाळीकर यांनी दिला आहे. पुढचे 4 दिवस राज्यांतल्या विविध भागांत कमी अधिक प्रमामात पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. पाकिस्तानने या चक्रीवादळाचं ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नामकरण केलं आहे. गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकतं.

बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ काल रात्री( 26 सप्टेंबर ) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकलं. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे 27 तारखेला विदर्भ आणि मराठवाडा, तर 28 तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती असेल?

27 सप्टेंबरपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगाने वारे वाहतील. कोकणात 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधागिरी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

हवामान विभागाकडून राज्यात 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट

आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिगोंली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आज अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Weather Alert | आज मध्यरात्री गुलाब वादळ गोपाळपूर, कलिंगपट्टणममध्ये धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

(Heavy Rain expected in Pune)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.