बारामती: आक्रमक आणि डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष घेताना मनात उमटलेल्या भावना पहिल्यांदाच शेअर केल्या. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मी जात होते. तेव्हा मला ईडी कार्यालयात घेऊन जात आहेत की काय अशी भावना मनात निर्माण झाली होती, असं रुपाली पाटील म्हणाल्या.
रुपाली पाटील या बारामतीत आल्या होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक-2021चे आयोजन बारामतीत करण्यात आलं होतं. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने उपस्थित होते. यावेळी रुपाली पाटील यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. माझा राष्ट्रवादी प्रवेश हा नियोजित नव्हता. प्रवेशाला जाताना मला वाटलं ईडी कार्यालयात नेतात का काय? असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, रुपाली पाटील यांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटला. तसेच स्वत: मैदानावर उतरून त्यांनी बॅटिंगचा आनंदही लुटला. राजकारणाच्या आखाड्यात फटकेबाजी करणाऱ्या रुपाली पाटील यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली. बारामतीकरांनीही त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यांच्यासोबत दहा महिलांना पक्षात प्रवेश देण्यात आला होता. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्यातून त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. रूपाली पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार …त्यामुळे त्यांना आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवेश नक्की झाला आहे, हे अखेर जाहीर केले आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 19 December 2021#FastNews #News #Headlinehttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/gY6mVehqZ8
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
Narayan Rane | कोकणात शिवसेनेचा धुव्वा उडणार : नारायण राणे