पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल नक्की कोण आहेत?; संपत्ती किती आहे?

who is vishal agarwal father of pune porsche accident accused vedant net worth : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल नक्की कोण आहे? विशाल अग्रवालची संपत्ती किती आहे? संपूर्ण माहिती वाचा एका क्लिकवर...

पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल नक्की कोण आहेत?; संपत्ती किती आहे?
who is vishal agarwal father of pune porsche accident accused vedant net worth all you need to know
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 1:14 PM

शनिवारी रात्री झालेल्या एका अपघाताने पुणे शहर हादरलं आहे. कल्याणीनगरमधील कार आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कसून चौकशी होत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पुणे आयुक्तालयात उपस्थित आहेत. अल्पवयीन तरूणाने मद्यप्राशन करून दुचाकीला धडक दिली. कारचालक अल्पवयीन असल्याने त्याचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला अटकही करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहे.

विशाल अग्रवाल नक्की कोण आहे?

‘ब्रम्हा कॉर्प’ या रिअल इस्टेट विकास कंपनीशी विशाल अग्रवाल संबंधित आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे. ब्रम्हा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संचालक आहेत. ‘ब्रम्हा कॉर्प’ ही पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी आहे. ब्रम्हदत्त अगरवाल हे ‘ब्रम्हा कॉर्प’चे संस्थापक आहेत. रामकुमार अगरवाल, विनोद कुमार अगरवाल, दिनेश अगरवाल, हिमांशू अगरवाल, करण अगरवाल, विशाल अग्रवाल हे या कंपनीत संचालक आहेत.

संपत्ती किती?

ब्रम्हा कॉर्पने पुण्यात आणि मुंबईत दोन हजाराहून अधिक इमारतींचं बांधकाम केलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध सनसिटी प्रोजेक्ट ब्रम्हा कॉर्पचाच आहे. 2003 ला हा प्रोजक्ट सक्सेसफुल झाला. त्यानंतर ब्रम्हा कॉर्प नावाजलं जाऊ लागलं. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात त्यांचे सर्वाधिक प्रोजक्ट्स आहेत. विशाल अग्रवाल यांना अलिशान गाड्यांची विशेष आवड आहे. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता ही 6 कोटी 1 लाख 20 हजार इतकी आहे.

कल्याणीनगरमध्ये काय घडलं?

पुणे शहराततील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या पोर्शे कारचा चालक अल्पवयीन होता. या कारने दुचाकीला एवढ्या जोरात धक्का दिला की या धडक दुचाकीवरील अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला. इंजिनिअर असणारी अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला. तर अनिसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.