AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांना गृहमंत्रीपद देणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर विधान; का म्हणाले असं?

एखादं चांगलं काम आम्ही सर्व मिळून करू शकतो. त्यामुळेच हा मेळावा होत आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. सरकारने 55 हजार पदे अधिसूचित केली आहे. उद्योगांना मानव संसाधनाची गरज आहे. हाच याचा अर्थ आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार देणारे आहेत. अजित पवार यांनी पुढाकार घेऊन हा रोजगार मेळावा आयोजित केला. त्यामुळे तरुणांना संधी मिळणार आहे.

अजितदादांना गृहमंत्रीपद देणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर विधान; का म्हणाले असं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2024 | 1:58 PM
Share

सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 2 मार्च 2023 : शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत आज सरकारचा नमो रोजगार मेळावा पार पडला. या रोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित होते. सर्वच दिग्गज आणि राजकारणातील एकमेकांचे विरोधक एकाच मंचावर आल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगेल असं वाटत होतं. पण देवेंद्र फडणवीस वगळता कुणीही राजकीय टोलेबाजी केली नाही. फडणवीस यांनी ही टोलेबाजी केली, पण ती शरद पवार गटाच्या विरोधात केली नाही. तर, फडणवीस यांनी थेट अजितदादांनाच चिमटे काढले. अजितदादा यांना गृहमंत्रीपद देण्यास जाहीरपणे नकारही दिला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यापूर्वी अजित पवार यांच्या प्रयत्नाने बारामतीत बांधणात आलेले अत्याधुनिक बस स्टँड, पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय आणि पोलिसांच्या निवासी इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं. एखाद्या कार्पोरेट ऑफिसमध्ये आल्याचा भास व्हावा असं पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन बांधण्यात आलं आहे. पोलिसांच्या निवासी इमारतीही हायफाय बांधण्यात आल्या आहेत. अजितदादांच्या या कामाचं देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केलं.

आता पोस्टिंगची मागणी वाढेल

अजितदादांनी हेवा वाटावं असं बस स्टँड बनवलं आहे. पोलीस क्वॉर्टर, पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशनही बांधलं आहे. एखाद्या कार्पोरेटचं ऑफिस वाटावं असं पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन झालं आहे. पोलिसांची निवासस्थानेही तशाच पद्धतीने बांधण्यात आली आहे. त्यामुळे माझ्याकडे बारामतीलाच पोस्टिंग करा म्हणून मागणी वाढेल. बारामतीत चांगली निवासस्थाने आणि पोलीस स्टेशन आहेत, त्यामुळे आम्हाला बारामतीला पाठवा, असा हेका पोलीस लावतील.

त्यामुळे मला असं वाटतंय, पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्या चांगल्या इमारती करण्यासाठी तुम्हालाच पीएमसी म्हणून नेमावं असं वाटतं. त्यावर अजितदादा म्हणतील, पीएमसीच का? गृह खातं माझ्याकडे द्या. मी चांगल्या इमारती बांधतो. पण दादा नाही, ते देणार नाही. गृहखातं माझ्याकडेच ठेवेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

सर्वांना रोजगार मिळेल

आम्ही राजकारणातील लोकं कंत्राटी कामगार आहोत. दर पाच वर्षाने आम्हाला आमचं कंत्राट रिन्यू करावं लागतं. चांगलं काम केलं तर लोक आम्हाला संधी देतात आणि नाही केलं तर लोक घरी बसवतात. पण तुम्ही चांगलं काम केलं तर तुमची प्रगतीच होते. नागपूरला आपण मेळावा घेतला. 11 हजार लोकांना रोजगार मिळाला. त्यांना 50 हजाराचे पॅकेज मिळाले. 10 वी आणि 12 वी पर्यंत शिकलेल्या लोकांनाही रोजगाराची संधी मिळाली. या मेळाव्यासाठी अजितदादांनी खूप मेहनत केली. या रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे आहेत. पण 36 हजार अर्ज आले आहेत. उद्यापर्यंत आणखी अर्ज येतील. सर्वांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार मिळेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.