कात्रज डेअरीच्या निवडणुकीत वेल्हे मतदार संघातून दोघांची माघार ; भगवान पासलकर बिनविरोध
या आधी हवेली तालुका मतदार संघातून म्हस्के यांनी माघार घेतली आहे. आतापर्यंत तीन जणांनी कात्रज डेअरीच्या निवडणूक रिंगनातून माघार घेतली आहे. यामुळं आता 16 जागांसाठी 88 उमेदवार रिंगणातेत.उमेदवारी अर्जाची 22 फेब्रुवारीला छाननी झाली, तेव्हापासून येत्या 8 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

विनय जगताप , वेल्हे – पुणे जिल्हा कात्रज दूध उत्पादक संघाच्या(Pune District Katraj Milk Producers Association) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून वेल्हातील दोघांनी माघार घेतली आहे. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर (Bhagawan Pasalkar) हे वेल्हे तालुका (Velha) मतदार संघातून बिनविरोध झाले आहेत. या मतदार संघात तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी दोघांनी माघार घेतल्यानं या मतदार संघातून विद्यमान संचालक भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिलाय. 8 मार्च पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदतयं. त्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
भगवान पासलकर हे वेल्हे मतदार संघातून बिनविरोध पुणे जिल्हा कात्रज दूध उप्तादक संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतून वेल्हातील दोघांनी माघार घेतलीय. यामुळे कात्रज डेअरीचे विद्यमान संचालक भगवान पासलकर हे वेल्हे तालुका मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेत. या मतदार संघात तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी दोघांनी माघार घेतल्यानं या मतदार संघातून विद्यमान संचालक भगवान पासलकर यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिलाय. 8 मार्च पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदतयं. यामुळं पासलकर यांच्या निवडीची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. कात्रज डेअरीच्या संचालक मंडळाच्या सोळा पैकी तीन जागा आतापर्यंत बिनविरोध झाल्या आहेत.
8 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत
या आधी हवेली तालुका मतदार संघातून म्हस्के यांनी माघार घेतली आहे. आतापर्यंत तीन जणांनी कात्रज डेअरीच्या निवडणूक रिंगनातून माघार घेतली आहे. यामुळं आता 16 जागांसाठी 88 उमेदवार रिंगणातेत.उमेदवारी अर्जाची 22 फेब्रुवारीला छाननी झाली, तेव्हापासून येत्या 8 मार्चपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.
Russia Ukraine War Live : रशियात फेसबूकवर बंदी
IND vs SL, 2nd T20I, LIVE Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना?
बीडमधील नोंदणी ऑफिसबाहेर गोळीबार, शिवसेना नेत्या पिता-पुत्रावर गुन्हा
