नवी मुंबईत पोलिसांसाठी स्वंतत्र क्वारंटाईन सेंटर, कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता पोलीस आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबईत शेकडोच्या संख्येने नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे.

नवी मुंबईत पोलिसांसाठी स्वंतत्र क्वारंटाईन सेंटर, कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता पोलीस आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण (Quarantine Center For Police) वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी यांनाही होत आहे. दिवसरात्र बंदोबस्तावर असलेल्या नवी मुंबईतील 30 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नेरुळ येथील पोलीस विश्रांती गृह आणि सावळी येथील तीन मजली इमारतीत (Quarantine Center For Police) स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

नवी मुंबईत शेकडोच्या संख्येने नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांसाठी स्वंतत्र व्यवस्था करण्याची मागणी होत होती. वस्तुस्थिती पहाता पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नेरुळ येथील विश्रांती गृह आणि सावळी येथील तीन मजली इमारतीत पोलिसांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर तयार केलं आहे.

कोरोनाबाधित पोलिसांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये 40 पोलीस कर्मचाऱ्यांना दाखल करण्याची व्यवस्था आहे. या सेंटरमध्ये प्रत्येकासाठी स्वतंत्र बेड, चादर, उशी आणि नातेवाईकांसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. तसेच, कोरोनाग्रस्त महिला आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र खोल्या ठेवण्यात आल्या आहेत (Quarantine Center For Police).

एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्यास त्याच्या स्वॅबचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याला या सेंटरमध्ये पाठवण्यात येते. पुढे तपासणीत तो कर्मचारी जर कोरोनाबाधित आढळला, तर त्याला रुग्णालयात हलविण्यात येते. ज्या कर्मचाऱ्याला घरीच क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जातो, त्याच्या घरी जर पुरेशी जागा उपलब्ध नसेल, तर त्या कर्मचाऱ्यालाही या सेंटरमध्ये ठेवले जाते.

या सेंटरच्या इमारतीचे दररोज निर्जंतुकीकरण केले जाते. त्याचबरोबर येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा अहवाल एसीपी (गुन्हेशाखा) नेतृत्त्वाखालील पथक दररोज तयार करतात. येथे आतापर्यंत 35 रुग्ण बरे होऊन घरी (Quarantine Center For Police) गेले आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना हॉटस्पॉट मालेगावातील आर्थिक चाकं फिरली, यंत्रमाग उद्योग सुरु झाल्याने हजारो मजुरांच्या हाताला काम

Dhule Corona | धुळे शहरात सक्तीची संचारबंदी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाचा निर्णय

गोरेगाव फिल्मसिटी काम, मुंबई-नागपूर विमानाने प्रवास, चंद्रपुरात पोहोचलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 हून अधिक कोरोनाबाधित, कोणत्या तालुक्यात किती?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *