Dhule Corona | धुळे शहरात सक्तीची संचारबंदी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाचा निर्णय

धुळे शहरातील 49 कंटेन्मेंट झोनमध्ये ही संचारबंदी सक्तीने पाळण्यात येणार असून शिरपूरमध्ये देखील संचारबंदी लावण्यात आली आहे.

Dhule Corona | धुळे शहरात सक्तीची संचारबंदी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाचा निर्णय

धुळे : धुळे शहर आणि शिरपूरमध्ये मोठ्या (Dhule Corona Curfew) प्रमाणावर कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने धुळ्यात आज जनता संचारबंदी लावण्यात आली आहे. धुळे शहरातील 49 कंटेन्मेंट झोनमध्ये ही संचारबंदी सक्तीने पाळण्यात येणार असून शिरपूरमध्ये देखील संचारबंदी लावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून हा (Dhule Corona Curfew) निर्णय घेण्यात आला होता.

धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर तीव्र झाल्याचे बघायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात 162 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात धुळे शहरात सर्वाधिक 102 तर शिरपूरमधे 37 कोरोनाबाधित आहेत. तर, जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 19 जणांनी आपला जीव गमावला आहे.

धुळे आणि शिरपूरमधे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमालीचे वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे (Dhule Corona Curfew).रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने धुळ्यात आज जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. धुळ्यात संचारबंदीमुळे नागरिकांना घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या बंदला धुळे व्यापारी संघटनेनेही पूर्णपणे पाठिंबा दिला आहे.

राज्यात कोरोनाचे 67,655 रुग्ण

राज्यात काल 2 हजार 487 नवीन कोरोनारुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या 67 हजार 655 वर पोहोचली आहे. तर काल 89 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच, 1 हजार 248 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 36 हजार 031 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण कोरोनाबळींची संख्या 2,286 इतकी झाली आहे.

Dhule Corona Curfew

संबंधित बातम्या :

कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 हून अधिक कोरोनाबाधित, कोणत्या तालुक्यात किती?

नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा वाढता, जिल्ह्यात आता 147 कंटेन्मेंट झोन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *