नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा वाढता, जिल्ह्यात आता 147 कंटेन्मेंट झोन

नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा वाढता, जिल्ह्यात आता 147 कंटेन्मेंट झोन

आता रेड झोन किंवा नॉन रेड झोन संपुष्टात आल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये कुठलीही शिथिलता नसेल (Nashik Containment Zones)

अनिश बेंद्रे

|

Jun 01, 2020 | 2:56 PM

नाशिक : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून नाशिक जिल्ह्यात आता 147 कंटेन्मेंट झोन झाले आहेत. गेल्या 48 तासात नाशिक महापालिकेने 21 भाग कंटेन्मेंट झोन घोषित केले. नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा वाढतानाच दिसत आहे. (Nashik Containment Zones)

कंटेन्मेंट झोनमध्ये 100 टक्के लॉकडाऊनची बंधने असणार आहेत. आता रेड झोन किंवा नॉन रेड झोन संपुष्टात आल्याने कंटेन्मेंट झोनमध्ये कुठलीही शिथिलता नसेल. नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण न सापडलेले आणि रुग्ण कोरोनामुक्त झालेले 31 कंटेन्मेंट झोन पालिकेने नुकतेच खुले केले.

नाशिक जिल्ह्यात आजच्या दिवसात (सोमवार 1 जून) आणखी 6 जण पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये सीआरपीएफचा जवान, नाशिकच्या विडी कामगारनगर मधील किराणा दुकानदार यांचाही समावेश आहे. नाशिक जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 1230 च्या पार गेली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

नाशिकच्या वडाळा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नाशिकमध्ये कालही 50 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात 330 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 72 जणांचा मृत्यू झाला.

– नाशिक शहर कालपर्यंत रुग्णसंख्या 214 (बरे झालेले 66, मृत्यू 8, उपचार घेत असलेले 140)

– मालेगाव कालपर्यंत रुग्णसंख्या 779 (बरे झालेले 611, मृत्यू 55, उपचार घेत असलेले 113)

नाशिक शहरात 6 एप्रिलला पहिला कोरोनाग्रस्त सापडला होता. एप्रिल अखेरपर्यंत शहरात केवळ दहा रुग्ण होते. मात्र मे महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने शहरात वाढली.

(Nashik Containment Zones)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें