AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग, पाच कामगार गंभीर

प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्याच महिन्यात वर्णी लागली होती. (Pravara Sugar Factory Fire)

विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग, पाच कामगार गंभीर
| Updated on: Mar 20, 2020 | 3:56 PM
Share

शिर्डी : भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष असलेल्या अहमदनगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग लागली. प्रवरा गावाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखर कारखान्याच्या वीज प्रकल्पाला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. (Pravara Sugar Factory Fire)

आगीने क्षणात रौद्र रुप धारण केल्यामुळे विखे पाटील साखर कारखाना परिसरात आगीचे लोळ दिसू लागले. त्यानंतर कारखान्याच्या अग्निशामक दलासह राहाता, शिर्डी, राहुरी तसेच संगमनेर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कारखान्यात काम करणारे पाच कामगार आगीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही घटनास्थळी दाखल होत मदतकार्य करण्यासाठी सूचना दिल्या. विखे यांची फेब्रुवारी महिन्यातच अध्यक्षपदी निवड झाली होती. अहमदनगरमधील प्रवरा येथे असलेला हा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे.

प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास 

राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. विठ्ठलरावांनी 1915 पासून अहमदनगरमधल्या प्रवरा परिसरात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरवलं आहे. (Pravara Sugar Factory Fire)

17 जून 1950 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर (लोणी) मध्ये आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरचा पहिला साखर कारखाना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला.

सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर 1964 मध्ये विखे कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. विठ्ठलराव विखे यांनी ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. त्यानंतर त्यांचे पुत्र बाळासाहेब विखे अर्थात राधाकृष्ण यांचे वडील 1962 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.

हे वाचलंत का? :

Pravara Sugar Factory Fire

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.