Video : कर्जत ते खोपोली दरम्यान रेल्वे मार्गाचा भराव वाहून गेला, रेल्वे ट्रॅक अधांतरी

कर्जत ते खोपोली दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेलाय. त्यामुळे रेल्वे ट्रॅक अधांतरी तरंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलादी पोलाला सिमेंटचे ब्लॉक लटकलेल्या अवस्थेत हा रेल्वे ट्रॅक पाहायला मिळत आहे.

Video : कर्जत ते खोपोली दरम्यान रेल्वे मार्गाचा भराव वाहून गेला, रेल्वे ट्रॅक अधांतरी
खोपोली-कर्जत रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेला
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 8:28 PM

रायगड : कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. कर्जत ते खोपोली दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेलाय. त्यामुळे रेल्वे ट्रॅक अधांतरी तरंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलादी पोलाला सिमेंटचे ब्लॉक लटकलेल्या अवस्थेत हा रेल्वे ट्रॅक पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली लोकल लाईनवर कर्जत ते खोपोली दरम्यान केळवली ते डोलवलीदरम्यान रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेला आहे. मुंबईपासून जवळपास 105 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला आहे. (soil flowed under the railway track between Karjat to Khopoli)

या परिसरात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आजूबाजूच्या डोंगरावरुन पाणी खालच्या शेतीमध्ये जमा झालं दोन नाल्याच्या दरम्यान रात्रीच्या सुमारास पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने दोन्ही नाल्याचे खांब वाहून गेले आहेत. आजूबाजूच्या शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेल्यामुळे या लाईनवरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. या रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागू शकतो असा अंदाज रेल्वे कर्मचाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या :  

Chiplun Flood : राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा, कोकणातील पूरस्थितीवरुन राणेंचा घणाघात

घरात पाणी शिरल्याने सुरक्षेसाठी घराबाहेर पडले, पाण्याचा अंदाज न आल्याने बाप-लेक नदीत वाहून गेले

soil flowed under the railway track between Karjat to Khopoli

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.