AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील या भागांत पावसाचे संकट, तापमानाबाबत हवामान विभागाचा अंदाज काय?

भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील या भागांत पावसाचे संकट, तापमानाबाबत हवामान विभागाचा अंदाज काय?
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे. आता येत्या 24 तासांत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 02, 2025 | 8:05 AM
Share

राज्यात पुन्हा पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानच्या पूर्व भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भातून केरळपर्यंत हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे. यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

तापमानात चढ-उतार होणार

सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. बदललेल्या वातावरणामुळे आज आणि उद्या पूर्व विदर्भातील तापमानात थोडी घट होणार आहे. हवामान विभागाने लोकांना बदलत्या हवामानाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या पावसानंतर राज्यात पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी

भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी संध्याकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. हा पाऊस धान शेतीसाठी फायदेशीर असला तरी मका, बागायती शेतीसाठी नुकसानकारक आहे. गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी झाली. या पावसामुळे धाण, मका, भाजीपाला आणि इतर पिकांना फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यात पाणी टंचाई जाणवणार नाही

राज्यातील धरणांत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध आहे. यामुळे राज्यात पाणी टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सध्या उन्हाची तीव्रता पाहता मे महिन्यात पाऊस पडेल अशी शक्यता आहे. तरीही 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राज्यातील धरणात आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.