AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : नद्यांना महापूर, धरणं भरणार, राज्यात सगळीकडे धो धो धो पाऊस, पंजाबराव डख यांनी अतिवृष्टीची तारीख सांगितली

मराठवाड्यातही परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशीव, बीड, जालना, संभाजीनगरात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. विदर्भात आठ दिवसात मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडेल.

Rain Update : नद्यांना महापूर, धरणं भरणार, राज्यात सगळीकडे धो धो धो पाऊस, पंजाबराव डख यांनी अतिवृष्टीची तारीख सांगितली
rain update and monsoon updatesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 01, 2026 | 7:36 PM
Share

Mosoon Update : सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण, मुंबई, उपनगरात तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई, उपनगरात पुढच्या पाच दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. असे असताना आता हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे पंजाबराव डख यांनी राज्यात कुठे कुठे पाऊस होऊ शकतो? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार नाशिक जिल्ह्यातून जी गोदावरी येते त्या नदीला 12 जुलैच्या दरम्यान महापूर येणार आहे. उस उत्पादक शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होईल असे सांगत त्या्ंनी गोदावरीला पूर येणार असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी मोटार, पाईपलाईन काढून घ्यावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

8 जुलैपर्यंत सगळीकडेच पाऊस होईल

येत्या 12 जुलैपर्यंत नंदूरबार, धुळे, नाशिक या भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. अतिवृष्टी होणार आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे. राज्यात पावसाचा जोर वाढत जाणार आहे. हा पाऊस 8 जुलैपर्यंत सगळीकडेच असेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्याील निळवंडे, भंडारदरा, गंगापूरचे धरण, उत्तर महाराष्ट्रातील छोट्या धरणांत पाण्याची आवक येण्यास सुरुवात होणार आहे. छोटे – छोटे पाझर तलाव आताच्या पावसातच भरून जातील, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.

पश्चिम महाराष्ट्रात काय होणार?

अहिल्यानगर, संगमनेर, अकोला, संभाजीनगर, जालना, अमरावती, बुलढाणा या परिसरातही आठ दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, जिल्हा, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या पट्ट्यातही 3 तीन जुलैपर्यंत पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

विदर्भात आठ दिवसात मुसळधार

मराठवाड्यातही परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशीव, बीड, जालना, संभाजीनगरात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. विदर्भात आठ दिवसात मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडेल. या पावसात ओढे-नाले वाहतील. येत्या 8 जुलैपर्यंतच्या काळात मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागात अतिवृष्टी होणार आहे. मुंबई, ठाणे या भागात सखल भागात पाणी साचणार असल्याचं भाकितही त्यांनी केलं आहे.

Follow Us
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन
Video : पुण्यात मनसेचं गुटखा माफियाविरोधात तीव्र आंदोलन, पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, पण... राम कदमांची टीका
Video : बाळासाहेबांनी खोटेपणाचं राजकारण केलं नाही, त्यांच्यानंतर मात्र..., राम कदमांची ठाकरे बंधूंवर टीका
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!