AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हगवणेचं मोठं कांड! स्वत:च्या बापालाही सोडलं नाही, जीवंतपणीच मारण्याचा प्रयत्न… काय होता नेमका डाव?

वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काल त्यांनी पोलिसांनी अटक केली आहे. आता त्यांच्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे.

हगवणेचं मोठं कांड! स्वत:च्या बापालाही सोडलं नाही, जीवंतपणीच मारण्याचा प्रयत्न... काय होता नेमका डाव?
Rajendra HagavaneImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 25, 2025 | 4:53 PM
Share

पुण्यातील वैष्णवी हगवणे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीला तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीमध्ये आहे. त्यानंतर वैष्णवीच सासरे राजेंद्र हगवणे यांच्याविषयी मोठी माहिती समोर येत आहे. त्यांनी स्वत:च्या वडिलांनाही सोडले नसल्याचे म्हटले जात आहे.

राजेंद्र हगवणेच्या वडिलांविषयी

राजेंद्र हगवणेच्या वडिलांचे नाव तुकाराम हगवणे होते. ते मुळशीतील भुकुम गावातील प्रसिद्ध पैलवान होते. आधी ते काँग्रेसमध्ये होते. नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा ते राष्ट्रवादीत आले. तुकाराम हगवणे पंचायत समितीचे सभापती होते. तसेच ते पुणे जिल्हा परिषदेतही होते. तसे पाहायला गेले तर राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे या भागातील राजकीय प्रस्थ होतं. पण राजेंद्र हगवणे राजकीयदृष्ट्या कधीही यश मिळाले नाही. राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2004 साली राजेंद्र मुळशी विधानसभा लढला. त्याला यश मिळाले नाही. तो सपाटून पडला. वाचा: वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची ‘करिश्मा’ आहे तरी कोण?

नेमकं काय केलं?

हगवणेचा शेती आणि दुधाचा व्यवसाय होता. राजेंद्रने कालांतराने जमिनीचे व्यवहार, कंत्राट देखील घ्यायला सुरुवात देखील केली होती. एकदा तर राजेंद्रने वडिलांच्या निधनाचे खोटे मृत्यूपत्र बनवून संपूर्ण मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा घाणेरडा डाव सर्वांसमोर आला आणि फसला.

सध्या संपूर्ण हगवणे कुटुंब तुरुंगात आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची हकलपट्टी करण्यात आली आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून हुंड्यात मिळालेल्या सर्वच गोष्टी जप्त केल्या आहेत. आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी