AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजू शेट्टी यांचे महादेवी हत्तीणीबद्दल मोठे विधान, मंत्रालयातील बैठकीला जाण्याच्या पूर्वीच म्हणाले…

माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात नेण्यात आलंय. मात्र, त्यानंतर तिला परत आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.  कोल्हापूरजवळच्या नांदणी मठात गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ राहणारी ‘महादेवी हत्तीण राहिली आहे.

राजू शेट्टी यांचे महादेवी हत्तीणीबद्दल मोठे विधान, मंत्रालयातील बैठकीला जाण्याच्या पूर्वीच म्हणाले...
Raju Shetty
| Updated on: Aug 05, 2025 | 11:09 AM
Share

महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात नेण्यात आलंय. मात्र, त्यानंतर तिला परत आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.  कोल्हापूरजवळच्या नांदणी मठात गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ राहणारी ‘महादेवी हत्तीण राहिली आहे. आता महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित याबाबत बैठक आयोजित करण्यात आलीये. या बैठकीला कोल्हापूर भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.

राजू शेट्टी देखील या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटले की, मेडिकल रिपोर्ट सांगतो की, तिला मल्टीपल फॅक्चर आहेत, तिला संधिवात आहे. मग वेगवेगळे नऊ रिपोर्ट देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत की, काहीही करून आम्हाला हत्ती पाहिजे म्हणून तिला मल्टीपल फॅक्चर आहेत तिला संधिवात आहे हे सांगितले गेले.

पुढे ते म्हणाले की, सरळ सरळ दिशाभूल केली गेलेली आहे. हे फक्त माधुरी हत्तीबद्दल झाले नाही तर शासनाचे अधिकारी वनतारामध्ये झाले आहे. जसे माधुरीचे व्हिडीओ पुढे येत आहेत, तसा शासनाच्या नेण्यात आलेल्या हत्तीचा व्हिडीओ का पुढे येत नाही. आम्हाला आमचा हत्ती पाहिजे आहे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले. इतर वेगवेगळ्या देवस्थानांचे जे हत्ती आहेत, तासगावच्या देवस्थानचा हत्ती आहे किंवा इतर आहेत, त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका. शासनाने हवे तर वेळोवेळी तपासण्या करा. पण कोणालातरी पाहिजे म्हणून आम्ही आमचे हत्ती देणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहण्यासारखे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी माधुरी हत्तीणीला नेल्यानंतर चांगलेच आक्रमक होताना स्पष्ट दिसत आहेत. वनताराकडून सातत्याने माधुरी हत्तीणीचे व्हिडीओ शेअर केली जात आहेत. वनतारामध्ये माधुरी हत्तीणीचा दिनक्रम कसा आहे, हे दाखवले जात आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, माधुरी हत्तीला वनतारामध्येच राहू द्या. सतत माधुरीच्या आरोग्याबद्दल वनताराकडून अपडेट दिली जात आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.