राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नाहीत; त्यांच्यात हे सत्य स्वीकारण्याचे धाडस नाही: दरेकर

राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. | Pravin Darekar

राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नाहीत; त्यांच्यात हे सत्य स्वीकारण्याचे धाडस नाही: दरेकर
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 10:46 PM

इचलकरंजी: राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांना राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे राजू शेट्टी (Raju Shetty) यांची शेतकरी नेते ही ओळख पुसली गेली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. (BJP leader Pravin Darekar slams Raju shetty)

ते गुरुवारी इचलकरंजीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले.

तसेच राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस राजू शेट्टी यांच्यात नाही. राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी हेच आहे. यासाठी आता राजू शेट्टी काय करतात, हे पाहावे लागेल, असे दरेकर यांनी म्हटले.

‘आमच्यावर टीका केली नाही तर सरकार कसे चालणार?’

आम्ही विरोधात आहोत तर सत्ताधारी आमचे कौतुक थोडी करणार आहेत? सरकारला भाजपची भीती वाटते. भाजपवर टीका केल्याशिवाय सरकार चालवता येणार नाही. आमच्यावर टीका केली नाही तर सरकारकडे सांगण्यासारखे काय आहे, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

अक्रोड-पिस्ता खातात, मशिनने मसाज करुन घेणारे आंदोलक देशाने कधी पाहिले नाहीत: प्रवीण दरेकर

दिल्लीत खरे शेतकरी किती आहेत, हे आता उघड झाले आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, भांडवलदार आणि अडत्यांचा समावेश आहे. अक्रोड-पिस्ता खाणारे मशिनने मसाज करुन घेणारे आंदोलक देशाने कधी पाहिले नाहीत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

संबंधित बातम्या:

‘शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध’

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलणारं केंद्रातलं हुकूमशाही सरकार : राजू शेट्टी

MCA च्या पदासाठी पवारांकडे कोण गेलेलं? राजू शेट्टींचा आशिष शेलारांवर घणाघात

(BJP leader Pravin Darekar slams Raju shetty)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.