Ramadan Eid Moon Sight : रमजान ईदला साजरा होणारा ‘ईद-उल-फितर’ नेमका काय? भारतात उद्या साजरी होणार ईद

रमजान संपेपर्यंत ईद-उल-फितरच्या वास्तविक तारखा जाहीर केल्या जाऊ शकत नाहीत, कारण या Eid-Ul-Fitr 2022 : तारखा वेगवेगळ्या असू शकतात. भारतात उद्या ईद साजरी केली जाणार आहे कारण ईदचा चंद्र आजच दिसला आहे परंतु सौदी अरेबियात 1 मेला चंद्र दिसला आहे आणि हा उत्सव शुक्रवार, 6 मे पर्यंत चालू शकतो.

Ramadan Eid Moon Sight : रमजान ईदला साजरा होणारा 'ईद-उल-फितर' नेमका काय? भारतात उद्या साजरी होणार ईद
ईद-उल-फित्र का साजरा केला जातो ?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 9:14 PM

मुंबई : जगभरात सध्या रमजान ईदची  (Ramadan Eid 2022) उत्साह आहे. जगभरातल्या बाजपेठाही गजबजल्या आहेत. भारतातही ही सण सर्वत्र साजरा होतो. ईद-अल-फितर (Eid-Ul-Fitr 2022) किंवा ईद-उल-फितर ही जगभरातील मुस्लिमांनी पाळली जाणारी एक प्रमुख धार्मिक प्रथा आहे. रमजान, इस्लामिक उपवासाचा पवित्र महिना संपतो. हा उत्सव रमजान महिन्यात मुस्लिम पाळत असलेल्या पहाटे ते संध्याकाळपर्यंतच्या उपवासाच्या 30 दिवसांच्या समाप्तीची आठवण देत असतो. याचा दिवस चंद्राच्या दर्शनावरून (Moon) ठरत असतो, तर जगभरातल्या पाळल्या जाणार्‍या अचूक तारखेमध्ये थोडाफार फरक असू शकतो, असेही सांगण्यात येते रमजान संपेपर्यंत ईद-उल-फितरच्या वास्तविक तारखा जाहीर केल्या जाऊ शकत नाहीत, कारण या तारखा वेगवेगळ्या असू शकतात. भारतात उद्या ईद साजरी केली जाणार आहे कारण ईदचा चंद्र आजच दिसला आहे परंतु सौदी अरेबियात 1 मेला चंद्र दिसला आहे आणि हा उत्सव शुक्रवार, 6 मे पर्यंत चालू शकतो.

चंद्र पाहताना मुस्लिम बांधव

लखनऊमध्ये कधी नमाज होणार

मोठ्या प्रमाणात दानधर्म केले जाते

मुस्लिम समाज ईद-उल-फित्र साजरा करतो,  जो त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा सण आहे. हा रमजानच्या शेवटी साजरा केला जातो ज्यामध्ये दानधर्माची कामं केली जातात, जसे की गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे, अशा गोष्टी होतात ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर मुस्लिम लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या जवळच्या लोकांना भेटतात. भारत सहसा सौदी अरेबियाच्या पाऊलावर पाऊल टाकते, आपल्याकडे सौदी अरेबियाच्या एक दिवसानंतर चंद्र दिसतो. काल सौदी अरेबियात चंद्र दिल्यानंतर आज भारतात चंद्र दिसला आहे, त्यामुळे उद्या ईद साजरी होणार आहे.

दोन वर्षांनंतर बाजारपेठा गजबजल्या

गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाने लावलेल्या ब्रेकरनंतर आता बाजरपेठा पुन्हा भरू आहेत. ईदच्या आधी खरेदीदारांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. आजूबाजूच्या बाजारपेठेतील दुकाने आणि स्टॉलवर स्थानिक लोक तसेच शहराच्या इतर भागातील लोकांनी खाण्याचे साहित्य, कपडे आणि चपला खरेदी केली गेली आहे, तर अजूनही काही जणांची खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणताही सण कोरोनामुळे मोकळेढाकळेपणे साजरा करता आला नव्हता, प्रत्येक सणावर मर्यादा आल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. यंदा मात्र कोरोनाची धास्ती कमी झाल्याने बऱ्यापैकी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात ईदचे सेलिब्रेनशन सुरू आहे. इतर धर्मांचे सणही यंदा दणक्यात साजरे होताना पहायला मिळत आहेत. यामुळे व्यवसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.