Ramdas Athavale|फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, शिवसेनेनं भाजपसोबत यावं, आठवलेंनी आळवला युतीचा राग!

रामदास आठवले म्हणाले की, कोरोनामुळे देशात 5 लाख मृत्यू झालेत. त्यामुळे गर्दी टाळायला हवी. कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी जशी सरकारची तशी आपली. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. देशापैकी 25 टक्के केसेस महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी. उद्धव ठाकरे यांनी लवकर बर होऊन कोरोनाविरोधात दंड थोपटावे, असे आवाहन त्यांनी केले.

Ramdas Athavale|फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, शिवसेनेनं भाजपसोबत यावं, आठवलेंनी आळवला युतीचा राग!
Ramdas Athavale, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis.
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 10:06 AM

नाशिकः शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं. त्यांनी भाजपसोबत यावं, असे आवाहन मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी आठवले यांनी दलित पँथरला 50 वर्षे पूर्ण झाले असून, पँथरच्या पुनरुज्जीवनाची गरजही व्यक्त केली. जाणून घेऊयात आठवले काय म्हणाले ते…

ठाकरेंनी लवकर बरे व्हावे

रामदास आठवले म्हणाले की, कोरोनामुळे देशात 5 लाख मृत्यू झालेत. त्यामुळे गर्दी टाळायला हवी. कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी जशी सरकारची तशी आपली. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. देशापैकी 25 टक्के केसेस महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी. उद्धव ठाकरे यांनी लवकर बर होऊन कोरोनाविरोधात दंड थोपटावे. उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहेत. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली होती, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. मात्र, शिवसेनेने भाजपसोबत यावे. फडणवीसांना मुख्यमंत्री करावे. भाजपला विश्वास होता की, काँग्रेस पाठिंबा देणार नाही. मात्र, त्यांचा तो अंदाज चुकल्याचे त्यांनी सांगितले.

दलित पँथरच्या पुनरुज्जीवनाची गरज

आठवले म्हणाले, दलित पँथरला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. पँथरच्या पुनरुज्जीवनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. येणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीत आम्ही भाजप सोबत राहणार आहोत. मात्र, युती झाली नाही तर आम्ही लढू. पंजाबमध्ये काँग्रेसने विश्वास गमावलेला आहे. बाबासाहेबांचे संविधान बद्दलण्यासाठी आणि दलितांचे आरक्षण रद्द करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवर आले आहे, असा अपप्रचार केला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेसला अध्यक्ष मिळेना

आठवले म्हणाले, राज्यपालांची तब्येत बिघडल्याने भेट पुढे ढकलली आहे. त्यांच्यासोबत पुढील भेटीत राज्याच्या राजकारणाबाबत चर्चा करू. काँग्रेसला अध्यक्ष मिळत नाही. सोनिया गांधी टेम्पररी अध्यक्ष आहेत. कोणत्याही राज्यात काँग्रेस स्ट्रॉंग नाही. त्यामुळे निवडणुकीत मागे पडतायत. मात्र, त्यांनी निवडणुका लढायला हव्यात. दोघांनाही माझी विनंती आहे की, कुणाचे जाळू नये. चायना पाकिस्थानसोबत लढायला एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले.

गोव्यात महामंडळ मिळेल

आठवले म्हणाले, गोव्यात निवडणुका न लढता महामंडळ देण्याचं कबूल केलं आहे. त्यामुळे भाजपची मते खाण्यापेक्षा मी त्यांच्यासोबत जाणार आहे आणि प्रचार देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी मंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देत होतो. या सरकारच्या काळात पगार मिळत नाही म्हणून विलीनीकरणाची मागणी पुढे आली. खरे तर समाजकल्याण खात्यात भ्रष्टाचार होणं अयोग्य आहे. ते गरिबांचं खात आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. शिवाय पंजाबमध्ये मोदींचा रस्ता काँग्रेसने अडवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

इतर बातम्याः

नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?

Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.