ग्रेटा आणि रिहाना, बंद करा तुमचा टीका करण्याचा बहाणा; रामदास आठवलेंचा काव्यमय टोला

अमेरिकेच्या पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे.

ग्रेटा आणि रिहाना, बंद करा तुमचा टीका करण्याचा बहाणा; रामदास आठवलेंचा काव्यमय टोला

मुंबई : अमेरिकेच्या पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका करणारे ट्विट केले आहे. त्याला उत्तर देताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी “ग्रेटा आणि रिहाना तुम बंद करो बहाणा” असे म्हणत त्यांच्या खास शैलीत सुनावले आहे. ग्रेटा आणि रिहाना तुम्ही केंद्र सरकार वर टीका करण्याचा बंद करा तुमचा बहाणा असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांना दिले आहे. (Ramdas Athawale slams Greta Thunberg and Rihanna over farmers Protest)

ग्रेटा थनबर्ग या किशोरवयीन पर्यावरण जागृतीच्या कार्यकर्ती आहे. त्यांच्या कार्याचे आम्हाला कौतुक आहे मात्र ग्रेटा यांनी भारतातील अंतर्गत बाबींवर भाष्य करू नये, तसेच इथल्या राजकीय घडामोडीत घुसू नये त्यांनी पर्यावरण जागृतीचे आपले चांगले काम करत राहावे असा सल्ला रामदास आठवले यांनी ग्रेटा थनबर्ग यांना दिला आहे.

आठवले म्हणाले की, शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत विषय आहे. यावर परकीय लोकांनी नाक खुपसू नये. भारतात लोकशाही आहे. इथे आपल्या प्रश्नांवर आंदोलन करण्यास सर्वांना मुभा आहे. आंदोलनाची दखल घेऊन सरकार आंदोलकांशी चर्चा करते. त्यातून आंदोलक आणि सरकार संबंधित प्रश्नावर मार्ग काढतात आणि आंदोलन मागे घेतले जाते. शेतकरी आंदोलनाबाबत मात्र आंदोलक शेतकरी आपल्या भूमिकेवरून मागे हटण्यास तयार नाहीत. केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी किमान 12 वेळा चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. ज्या कायद्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे त्या कायद्यांच्या अंमलबाजवणीस केंद्र सरकारने स्थागती दिली आहे. त्यामुळे आता आंदोलन करण्याचे काहीही कारण उरलेले नाही. तर शेतकरी आंदोलन सुरु आहे.

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचे आता राजकियिकरण झाले आहे. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा विरोधी पक्षांना आंदोलनात राजकारण अधिक दिसत आहेत, तसेच आता या परकीय पॉप स्टार रिहाना यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर केलेली टीकाटिप्पणी हे राजकीय षडयंत्र दिसत आहे, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

रिहाना यांनी आपल्या गायन कलेवर लक्ष दिले पाहिजे राजकारणात आणि नको तिथे त्यांनी गळा काढू नये. त्यांच्या देशातील प्रश्नांवर त्यांनी लक्ष घालावं. त्यांनी भारताच्या अंतर्गत बाबींवर बोलू नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी पॉप स्टार रिहाना यांना दिला आहे.

पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा कायदा करण्याची आठवलेंची मागणी

मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्य सभेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत झालेल्या चर्चेत भाग घेताना रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींचे अभिभाषण देशाचा सर्वांगीण विकास साधण्याचे दिशा दर्शन करणारे असल्याचे म्हटले आहे.

आगामी जनगणना ही जाती आधारित करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्रात मराठा, उत्तर प्रदेशात ठाकूर, हरियाणामध्ये जाट आणि राजस्थानमध्ये रजपूत या क्षत्रिय जाती आरक्षणाची मागणी करीत आहेत. त्यामुळे देशभरात क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 10 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत केली.

हेही वाचा

Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट

मोदी सरकारविरोधात जगातल्या प्रसिद्ध पॉपस्टारचं ट्विट, इंटरनेट बंदीवर सवाल, कोण आहे रिहाना?

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

(Ramdas Athawale slams Greta Thunberg and Rihanna over farmers Protest)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI