AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस ठेवली.., रामदास कदम आपल्या दाव्यावर ठाम, आता घेतला मोठा निर्णय, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

रामदास कदम यांनी गंभीर आरोप केला आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असा दावा त्यांनी केला आहे, त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस ठेवली.., रामदास कदम आपल्या दाव्यावर ठाम, आता घेतला मोठा निर्णय, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 2:53 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मोठा दावा केला होता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा दावा त्यांनी केला होता. दरम्यान कदम यांच्या या दाव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. कदम यांच्या दाव्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, मी गद्दार आणि  नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यानंतर आता कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अज्ञानाचं प्रदर्शन केलं आहे. मी जे दसरा मेळाव्यात बोललो, त्यात मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता. ते उपचार करत होते. ते त्यांचं म्हणणं आहे. अनिल परब पैशांसाठी त्या डॉक्टरांवर दावा टाकणार आहेत का? असा सवाल यावेळी कदम यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी आज निर्णय घेतला आहे. या प्रकरणावर शासनाने सीबीआय चौकशी करावी. याचं पत्र मी सीएमला सोमवारी देणार आहे. दोन दिवस बॉडी का ठेवली? याची चौकशी करावी. म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

कदम यांनी नेमका काय केला होता दावा? 

शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना कदम यांनी मोठा दावा केला होता, बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असं त्यांनी म्हटलं होतं, यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...