AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे-कदम वादात आता फडणवीसांचे नाव, रामदास कदमांनी केली ठाकरेंची पोलखोल; म्हणाले…

उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर 2014 ला रामदास कदम यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? असा सवाल परब यांनी कदम यांना विचारला होता. याला आता रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे.

ठाकरे-कदम वादात आता फडणवीसांचे नाव, रामदास कदमांनी केली ठाकरेंची पोलखोल; म्हणाले...
Uddhav Thackeray fadnavis and kadam
| Updated on: Oct 05, 2025 | 5:17 PM
Share

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले होते. त्यांचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाष्य केले होते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर 2014 ला रामदास कदम यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? असा सवाल परब यांनी कदम यांना विचारला होता. याला आता रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

ठाकरे-कदम वादात आता फडणवीसांचे नाव

आज झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, ‘अरे अनिल परब्या. मला मंत्रीपद दिलं ते पर्यावरण खातं दिलं. तेव्हा पर्यावरण खातं नव्हतं. इतिहासात हे खातं नव्हतं. मला काही तरी द्यायचं म्हणून दिलं. सुभाष देसाई आणि दिवाकर रावतेंना महामंडळ दिलं. मी महामंडळ मागायला गेलो मुख्यमंत्र्यांकडे. फडणवीस यांच्याकडे. तेव्हा फडणवीस म्हणाले, उद्धवजींनी सांगितलं रामदास भाईंना महामंडळ द्यायचं नाही. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो.’

माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला

पुढे बोलताना कदम म्हणाले की, ‘मी उद्धव ठाकरेंना विचारलं तर म्हणाले तुम्हाला देणार नाही. मी दाव्याने सांगतो. मला नामधारी केलं. माझ्या मुलाला तिकीट देत नव्हते. तेव्हा शेवटचं हत्यार काढलं. तेव्हा जबरदस्तीने तिकीट दिलं आणि योगेशला पाडण्याचा प्रयत्न केला. अनिल परब्या मला तुझ्या मालकानेच गुहागरला पाडलं. मी दापोली मागत होतो मग गुहागरच तिकीट का दिलं?’ असा सवालही कदम यांनी केला आहे.

अनिल परबांमुळे शिवसेना फुटली – कदम

अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करताना रामदास कदम म्हणाले की, ‘अनिल परब भाडखाऊ. त्याची लायकी नाही माझ्या पायाजवळ राहायची. हा मातोश्रीजवळ का आला. पक्ष फुटला. सर्व नेते बाहेर गेले. हा चमचा कारणीभूत आहे. याच्या विभागात त्याने किती लोकं निवडून दिले. त्याला फक्त चुगल्या करायच्या आवडतात. उद्धव ठाकरेंना असे लोक आवडतात. तो नीच आहे.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...