बलात्काराचा आरोपी कोव्हिड सेंटरमधून पळाला, पोलिसांनी 24 तासात कसा पकडला? वाचा थरार

वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयातील कोविड केअर केंद्रातून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय (rape accused escapes from covid center in Wardha).

बलात्काराचा आरोपी कोव्हिड सेंटरमधून पळाला, पोलिसांनी 24 तासात कसा पकडला? वाचा थरार
बलात्काराचा आरोपी कोव्हिड सेंटरमधून पळाला
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 3:50 PM

वर्धा : वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयातील कोविड केअर केंद्रातून पळालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. संबंधित आरोपी हा गुरुवारी (18 मार्च) सकाळी कोव्हिड सेंटरमधून पळाला होता. पोलिसांनी त्याला दिवसभर शोधलं. त्यानंतर अखेर यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथून त्याला अटक करण्यात आली (rape accused escapes from covid center in Wardha).

नेमकं प्रकरण काय?

ओमप्रकाश शेडमाके असं आरोपीच नाव आहे. सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात पोस्कोच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याला सुरुवातीला क्वारंटाईन कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्याला त्रास जाणवत असल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं (rape accused escapes from covid center in Wardha).

आरोपी कोव्हिड सेंटरमधून कसा पळाला?

आरोपीने गुरुवारी पहाटे कोरोना वार्डातील मागील बाजूच्या खिडकीतून पळ काढला. कोरोना पॉझिटिव्ह असलेला आरोपी हा रुग्णालयातून पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. या आरोपीला 16 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विभागात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसल्याने रुग्णालयाच्या द्वारावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, आरोपीने मागील खिडकीतून पळ काढला. अखेर रात्री या आरोपीला यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथून अटक करण्यात आलीय.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

संबंधित आरोपीवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे. त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या आरोपी विरोधात सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा तो फरार होता. पोलिसांनी खूप प्रयत्न करुन त्याचा छडा लावला होता. त्यावेळी तो यवतमाळ येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी पळाला होता. यावेळी देखील तो तिथेच गेला असू शकतो, असा अंदाज पोलिसांनी लावला. त्यानंतर पोलिसांचं एक पथक यवतमाळ येथील पांढरकवडा येथे त्याच्या नातेवाईकांच्या घरी दाखल झाले. तिथे तपास केला असता आरोपी पोलिसांना सापडला. पोलिसांनी तेथून अटक करुन त्याला पुन्हा वर्ध्यात आणलं.

आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल

बलात्काराच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत असलेल्या या आरोपीच्या विरोधात रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी सेवाग्राम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : शिवसेना उपतालुका प्रमुखाचा प्रेयसीच्या घरात गळफास, कुटुंबाला हत्येचा संशय

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.