मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पोफळी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी

रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी इथं दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीतील पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. (Chief Minister Uddhav Thackeray inspects Pofli Dam hydropower project) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पोफळी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 4:26 PM

रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी इथं दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीतील पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. (Chief Minister Uddhav Thackeray inspects Pofli Dam hydropower project)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी १० च्या सुमारास कोयनानगर हेलीपॅडवर दाखल झाले. त्यानंतर मोटारीने ते पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा – 4 ची पाहणी केली. उद्धव ठाकरे हे कोळकेवाडी टप्पा 4 ला भेट देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. तयावेळी पोफळी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोफळी धरणाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री कोयना धरणाकडे रवाना झाले. कोयना धरण परिसराची पाहणी केल्यानंतर ते विश्रामगृहात थांबणार होते. पण आपल्या दौऱ्यात अचानक बदल करुन ते पुण्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी अचानक विश्रामगृहाचा दौरा रद्द केल्यानं तिथे निवेदन देण्यासाठी आलेल्या अनेकांची निराशा झाली. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले होते की पर्यटनासाठी? असा सवाल यावेळी उपस्थितांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्रमांक 2च्या प्रकल्पस्थळाकडे रवाना झाले. तिथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते पुसगाव यादरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची ते पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर बांधकामाचं सादरीकरणही केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या:

ठाकरे मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंड, सोशल मीडियातून त्रास दिल्यास शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Chief Minister Uddhav Thackeray inspects Pofli Dam hydropower project

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.