रत्नागिरीतील एकमेव 'कोरोना' रुग्णाची उपचारानंतर पहिली चाचणी, अहवाल काय?

50 वर्षीय रुग्ण दुबईहून गुहागरमधल्या शृंगारतळी गावी आला होता. त्यावेळी तो विमानतळावर निगेटिव्ह होता, मात्र काही दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता (Ratnagiri Corona Patient Report Negative)

रत्नागिरीतील एकमेव 'कोरोना' रुग्णाची उपचारानंतर पहिली चाचणी, अहवाल काय?

रत्नागिरी : रत्नागिरीच्या रहिवाश्यांना दिलासा देणारी बातमी समोर आलो आहे. जिल्ह्यातील एकमेव ‘कोरोना’बाधित रुग्णाची उपचारानंतरची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्यास रत्नागिरी ‘कोरोना’मुक्त ठरेल. (Ratnagiri Corona Patient Report Negative)

‘कोरोना’ग्रस्ताची दुसरी चाचणी 24 तासानंतर होईल. त्याचा अहवाल आज उशिरा येईल. या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत काल माहिती दिली.

दुबईहून 50 वर्षीय रुग्ण गुहागरमधल्या शृंगारतळी गावी आला होता. त्यावेळी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्यास त्याला डिस्चार्ज मिळेल, परंतु पुढील 14 दिवस घरीच विलग राहावे लागेल. रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

विमानतळावर निगेटिव्ह रिपोर्ट, रत्नागिरीच्या रुग्णाला ‘असे’ झाले कोरोनाचे निदान

संबंधित रुग्ण दुबईमध्ये नोकरी करतो. ‘कोरोना’च्या थैमानामुळे तो दुबईहून परत आला. विमानतळावर त्याची तपासणी झाली, मात्र तो कोरोनाग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला. तिथून तो शृंगारतळीला आला.

मंगळवार 17 मार्चला ताप येऊ लागल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. तो दुबईहून आला असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरनी त्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवले. त्यांनाही ही माहिती लक्षात आल्यानंतर त्यांनी या रुग्णाला गुहागर ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवले. तिथून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. (Ratnagiri Corona Patient Report Negative)

जिल्हा रुग्णालयाकडून लगेचच त्याच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. तो ‘कोरोना’ग्रस्त असल्याची अधिकृत माहिती रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. त्यांच्यासोबत आणखी दोघेजण दुबईहून आले होते, सुदैवाने त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 225 वर पोहोचला आहे. मुंबईत एक, पुण्यात दोन, तर बुलडाण्यात दोन नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात दहा जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील सात, तर नवी मुंबई, पुणे आणि बुलडाण्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई94146656225335
पुणे (शहर+ग्रामीण)40180168571127
ठाणे (शहर+ग्रामीण)63778276421705
पालघर 100784967194
रायगड88654174164
रत्नागिरी88461030
सिंधुदुर्ग2622175
सातारा1780102868
सांगली66235018
नाशिक (शहर +ग्रामीण)73164209300
अहमदनगर (शहर+ग्रामीण)89455622
धुळे152386078
जळगाव 60303508353
नंदूरबार 27914911
सोलापूर43132161351
कोल्हापूर 122082220
औरंगाबाद84324304341
जालना108357147
हिंगोली 3422792
परभणी2141035
लातूर 71933635
उस्मानाबाद 39524617
बीड2351185
नांदेड 60625224
अकोला 1876149894
अमरावती 85864037
यवतमाळ 44829114
बुलडाणा 4121616
वाशिम 1951065
नागपूर2034138722
वर्धा 34141
भंडारा162891
गोंदिया 2161563
चंद्रपूर177980
गडचिरोली115711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)202031
एकूण26092414450710482

Ratnagiri Corona Patient Report Negative

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *