AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊत यांचा सनसनाटी आरोप, बावनकुळे यांचा खुलासा, पण आदित्य ठाकरे गोत्यात…

संजय राऊतांनी जो फोटो ट्विट केला तो बावनकुळेंनी फेटाळलेला नाही. पण, जेवण करण्यासाठी कुटुंबियांसोबत गेल्याचं बावनकुळे म्हणाले. मात्र, राऊतांनी सत्तावीस फोटो आणि पाच व्हिडीओ असल्याचे सांगत भाजपला धडकी भरवण्याचा प्रयत्न केलाय.

राऊत यांचा सनसनाटी आरोप, बावनकुळे यांचा खुलासा, पण आदित्य ठाकरे गोत्यात...
SANJAY RAIT, ADITYA THACKAREY AND BAVANKULEImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Nov 20, 2023 | 11:03 PM
Share

मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : सकाळी पत्रकार परिषदेतून भाजप आणि सरकारवर तुटून पडणाऱ्या संजय राऊत यांनी केलेल्या ट्विट ने राज्यात खळबळ उडवली. बावनकुळे यांचा फोटो राऊत यांनी ट्विट केला. एवढंच नाही तर साडेतीन कोटी रुपये उडवल्याचा आरोपही राऊतांनी केला. बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळले. त्याचवेळी भाजपने आदित्य ठाकरे यांचे फोटो tweet करून शिवसेनेला डीवचलं आहे. राऊत यांनी माझ्याकडे सत्तावीस फोटो आणि पाच व्हिडीओ आहेत. महाराष्ट्रातला एक माणूस जाऊन साडेतीन कोटी रुपये त्या कसीनोमध्ये उडवतो असे आरोप करून संजय राऊतांनी एकच खळबळ उडवून दिली. त्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी दिवसाढवळ्या गांजा आणि चिली मोडणारे आरोप करतायेत असा पलटवार केलाय.

संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोतला फोटो ट्विट केला. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मुक्काम मकाऊ येथे साधारणतः साडेतीन कोटी कसिनो जुगारात उडवले असा आरोप राऊत यांनी केला. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्यूत खेळले तर बिघडलं कुठे? तेच आहेत ना? मी का कोणाचं नाव घेतलं नाही ते फोटोतली जी व्यक्ती आहे. ते आता त्यांनी सांगावं तो मी नव्हेच. मी कोणाच्या व्यक्तिगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण महाराष्ट्रात काय चाललंय? सामाजिक वातावरण काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला.

राऊत यांच्या या आरोपानंतर खुद्द बावनकुळे यांनी कुटुंबियांसोबतचा फोटो ट्विट करत मकाउतल्या त्या हॉटेलमध्येमध्ये restaurant आणि कसिनो एकच असल्याचं म्हटलं. मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो. तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्रावुंड फ्लोरवर restaurant आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबियांसह restaurant मध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असा खुलासा त्यांनी केला.

बावनकुळेंच्या या स्पष्टीकरणावरून राऊतांनी पुन्हा इशारा दिला. जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. आणखी सत्तावीस फोटो आणि पाच video असल्याचा दावा राऊतांनी केला. राऊतांनी केलेल्या या आरोपामुळे फडणवीस आणि आशिष शेलारही आक्रमक झाले. राऊत हताश झाले असून विकृत मानसिकता असल्याची टीका फडणवीस यांनी केली. संजय राऊत यांची विकृत मानसिकता ही त्यातनं झळकतेय. ते किती दिस्प्रेट झाले हे त्यातनं लक्षात येतं. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केलाय. पूर्ण फोटो जर ट्विट केला तर त्यात स्पष्टपणे लक्षात येतंय. बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांची मुलगी आहेत, त्यांचा परिवार आहे, नातू आहे. सगळे त्याच्यामध्ये दिसतायेत. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं FRASTRESHION योग्य नाही आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राजकीय पक्ष विशेषतः महाराष्ट्रात त्याच्यातही प्रभादेवीला बसणारे आणि त्याचे विशेषतः स्वतःला संपादक म्हणवणारे कोणी ट्विट करणार असेल तर त्यांनी त्याबरोबर नो अल्कोहोल कॉन्सूम असं प्रमाणपत्र पहिलं ट्विट करावं. नो गांजा सेवन आम्ही केलेलं नाही. असं प्रमाणपत्र त्यांनी स्वतः पहिले ट्विट करावं आणि मगच काय म्हणायचं ते म्हणावं. दिवसाढवळ्या गांजा आणि चिलीम उडणारे दुसऱ्यावर आरोप करतायेत, अशी जळजळीत टीका केलीय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या फोटोंच प्रकरण थेट CBI च्या चौकशीच्या मागणीपर्यंत नेलं. संजय राऊतांनी जो फोटो ट्विट केलाय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये भाजपच्या ते प्रांताध्यक्षाचा फोटो दिसत आहे. तो तपासला गेला पाहिजे. वेळ आलं तर CBI ची चौकशी व्हायला पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाऊन तिथं खेळत असतील. तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे, असे पटोले म्हणाले.

राऊत यांनी थेट बावनकुळे यांचा फोटो ट्विट करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर भाजपनं ट्विटला ट्विटनं उत्तर दिलंय. आदित्य ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला. ज्यात फरहान अख्तर आणि सुप्रसिद्ध फुटबॉल डेव्हिड आहेत. मागच्या साईडला आदित्य ठाकरे असून त्यांच्या हातात ग्लास दिसतोय. हा फोटो नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमधील भारत आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्या दरम्यानचा आहे.

भाजपनं हा फोटो ट्विट करताना, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधीही जुगार खेळले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी आहेत तेथील आहे. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झाला त्यांची दृष्टी त्या पलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजूभाऊ आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे? त्यावर राऊत यांनी हा मग फुटबॉलपटू जो आहे प्रख्यात तो कोण आहे? आज जे मोदी पितात तेच ते ते पीत आहेत. मोदींचा जो ब्रँड आहे बरं का? मोदी जे पितात ना परदेशात जाऊन हा तोच ब्रँड आहे. आदित्य तोच ब्रँड घेत आहेत असे म्हणत भाजला उत्तर दिलंय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.