AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावतीचा मनपा आयुक्त येडपट, रवी राणांच्या टीकेचा दर्जा घसरला, तर नवनीत राणा म्हणतात…

रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता तो कट्टा मनपाने तोडला आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्याआमदार रवी राणा (Ravi Rana, Navneet Rana) यांनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याबद्दल वादग्रस्त व अपमानास्पद टीका केली.

अमरावतीचा मनपा आयुक्त येडपट, रवी राणांच्या टीकेचा दर्जा घसरला, तर नवनीत राणा म्हणतात...
नवनीत राणा आणि रवी राणा.
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 5:47 PM
Share

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा (Chatrapati Shivaji Maharaj) वाद पेटला आहे. राणांच्या कार्यकरत्यांनी पुतळा बसवल्यानंतर पालिकेने तो हटवला. त्यानंतर राणांच्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याविरोधात जोरदार घोणाबाजी केली. आता पुन्हा तोच पुतळा आणि तोच वाद चर्चेत आला आहे. रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होता तो कट्टा मनपाने तोडला आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्याआमदार रवी राणा (Ravi Rana, Navneet Rana) यांनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याबद्दल वादग्रस्त व अपमानास्पद टीका केली, आयुक्त आष्टीकर यांना अक्कल नाही, वेडपट आहेत, त्यांनी जरा समजदारीन वागलं पाहिजे अशी टीका राणा यांनी केली. त्यामुळे हा वाद पुन्हा वाढला आहे. गेल्यावेळीही याच पुतळ्याच्या वादावरून जोरदार आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी राणांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.

नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरेंना टोला

या पुतळ्यावरून गेल्या आंदोलनातही नवणीत राणा उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होत्या. आज त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा कट्टा हटवला तो सूड बुद्धीने हटवला आहे, यावरून राजकारण सुरू आहे, येत्या 19 फेब्रुवारीला तिथं पुन्हा पुतळा बसवला जाणार आहे असेही रवी राणा म्हणाले आहेत, शिवसेना सरकार असताना आम्हाला पुतळा उभारायला हा त्रास होतोय, बाळासाहेब ठाकरे असते तर कुणी बोट दाखवलं नसतं, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

बच्चू कडू यांच्याबद्दल काय म्हणाल्या?

अधिकाऱ्यांना दम दिला, उलट सुलट बोलणं खूप सोपं आहे, तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे शब्द वापरले तर शेतकऱ्यांच नक्कीच भलं होईल, असा टोला त्यांनी बच्चू कडू आणि अधिकारी वादाच्या ऑडिओ क्लिपवरून लगावला आहे. तसेच त्यांना बडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. वाईनच्या विरोधात आम्ही आहोत. याला महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विरोध आहे पण बंडातात्या कराडकर यांचे महिलांबाबत असं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही, असेही त्या म्हणाल्या आहेत. बंडा तात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावर आता सर्व स्तरातून विरोध होत आहे.

सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधात औरंगाबादमध्ये MIM रस्त्यावर, क्रांती चौकात निदर्शनं, घोषणाबाजी!

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं! ऑडिओ क्लिप व्हायरल

BMC Budget 2022: बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काहीच नाही, गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प; भाजपसह काँग्रेसचीही शिवसेनेवर टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.