AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री; महाराष्ट्रात कोणकोणाचा पद्म पुरस्काराने सन्मान?

माजी मुख्यमंत्री मनोज जोशी, पंकज उदास, सुशील मोदी यांसह 19 जणांना पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांसह तब्बल 113 जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री; महाराष्ट्रात कोणकोणाचा पद्म पुरस्काराने सन्मान?
manohar joshi ashok saraf
| Updated on: Jan 25, 2025 | 10:32 PM
Share

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानला जातो. देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार हा तीन श्रेणींमध्ये दिला जातो. पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात येणाऱ्या मान्यवरांच्या नावांची केंद्र सरकारच्या वतीनं घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राजकारण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील एकूण 139 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या पद्म पुरस्कारांमध्ये 7 मान्यवरांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर माजी मुख्यमंत्री मनोज जोशी, पंकज उधास, सुशील मोदी यांसह 19 जणांना पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांसह तब्बल 113 जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

पद्मभूषण पुरस्काराने ‘या’ व्यक्तींचा सन्मान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच भारतातील उत्कृष्ट गझल गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच बॉलिवूडचे अतिशय प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकि‍र्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील किती दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार?

कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले आहेत. यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना जाहीर झाले आहेत.

व्यापार आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.

  • अच्युत पालव – कलाक्षेत्र
  • अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
  • अशोक सराफ – कलाक्षेत्र
  • अश्विनी भिडे-देशपांडे – कलाक्षेत्र
  • चैत्राम पवार – सामाजिक सेवा
  • जसपिंदर नरुला – कलाक्षेत्र
  • मारुती चितमपल्ली – साहित्यिक आणि अभ्यासक
  • रणेंद्र मुजुमदार – कलाक्षेत्र
  • सुभाष शर्मा – शेती
  • वासुदेव कामत – कलाक्षेत्र
  • विलास डांगरे – औषध

13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार

या वर्षी एकूण 139 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये 07 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यांसह 23 महिला तर 10 हे परदेशी नागरिक आहेत. यातील 13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.