Revati Sule Reception : रोहित बहोत लढते हो, कभी हसा तो करो… पंतप्रधान मोदींनी मिश्किल भाष्य करताच पवार कुटुंबीयांना फुटले हसू; नेमकं काय घडलं? Video

Revati Sule And Sarang Lakhanee Reception : सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे आणि अरुण लखानी यांचे पूत्र सारंग लखानी यांचा रिसेप्शन सोहळा नवी दिल्लीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रोहित पवार जेव्हा एकमेकांना भेटलं तेव्हा नेमकं काय घडलं... याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Revati Sule Reception :  रोहित बहोत लढते हो, कभी हसा तो करो... पंतप्रधान मोदींनी मिश्किल भाष्य करताच पवार कुटुंबीयांना फुटले हसू; नेमकं काय घडलं? Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी - रोहित पवार
| Updated on: Aug 11, 2026 | 1:23 PM

Revati Sule And Sarang Lakhanee Reception : मागच्या महिन्यात मुंबईत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह सोहळा पार पडला. काल दिल्लीत रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजकारणातील दिग्गज दिल्लीतल्या या रिसेप्शन सोहळ्याल हजर होते. यात पंतप्रधान मोदींपासून ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सर्व झाडून हजर होते. रेवती आणि सारंग यांना शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी अनेक वरिष्ठ नेतेमंडळी कार्यक्रम स्थळी पोहोचले. यात पंतप्रधान मोदी आणि रोहित पवार यांची भेट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. रोहित पवार हे कायमच सरकारवर निशाणा साधत असतात. पण मोदींसोबतची त्यांची भेट, संवाद पाहिल्यानंतर भारतीय राजकारणाचं सौंदर्य दिसून येतं.

सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रोहित पवार यांचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी नववधू आणि वराला भेटण्यासाठी येतात तेव्हा सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील तरुण पिढीची ओळख पंतप्रधानांसोबत करुन दिली. मोदींसोबत पवार कुटुंबातील तरुण पिढीचं फोटोसेशन देखील झालं. प्रत्येक जण मोदींना भेटण्यासाठी पुढे येते असताना, रोहित पवार मात्र त्यांच्या पत्नीसोबत मागे उभे होते.

 

 

अशात सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांचा हात धरला आणि त्यांना खेचलं. त्यांना पंतप्रधानांच्या पुढे उभं केलं. त्यानंतर रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्याच क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.

या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी कुंती पवार यांचा संवाद बघायला मिळाला. या संवादामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदार रोहित पवार यांच्या कामांची विचारणा केली आणि रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार यांच्याशी देखील पंतप्रधान मिश्किलपणे बोलले की,रोहित बहोत लढते हो कभी हसा तो करो असा संवाद पवार दांपत्यांशी केला..

सांगायचं झालं तर, रोहित पवार कायम भाजप आणि सरकार विरोधात कठोर भूमिका मांडत असतात. गंभीर मुद्द्यांवर बोट ठेवत ते थेट पंतप्रधान मोदी यांना जाब विचारत असतात. आतापर्यंत रोहित पवार यांनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं आहे… अशात रेवती सुळे यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रोहित पवार यांची भेट राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शन सोहळ्याबद्दल सांगायचं झालं तर, दिल्लीत त्यांचा रिसेप्शन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रिस्पेशनच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us