AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Arya Encounter : रोहित आर्यानं बड्या अभिनेत्रीला बोलवलं होतं ऑडिशनला, नेमका काय होता प्लॅन, खळबळजनक माहिती समोर!

मराठमोळी अभिनेत्री ऋचिता जाधव हिला रोहित आर्याने कॉल केला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्याने ऋचिताला आरे स्टुडिओत येण्याचे आवाहन केले होते.

Rohit Arya Encounter : रोहित आर्यानं बड्या अभिनेत्रीला बोलवलं होतं ऑडिशनला, नेमका काय होता प्लॅन, खळबळजनक माहिती समोर!
rohit arya and ruchita jadhav
| Updated on: Oct 31, 2025 | 2:51 PM
Share

Rohit Arya Encounter Case : मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत एकूण 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. पोलिसांनी खडकीचा काच फोडून आत प्रवेश करून मुलांची सुटका केली. यावेळी रोहित आर्यावर गोळीबार करण्यात आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आता या प्रकरणात रोज नवनवे खळबळजनक खुलासे होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित आर्या सरकारकडे त्याचे थकलेले पैसे मागत होता, असा दावा केला जातोय. तर दुसरीकडे रोहित आर्याशी सरकारने कोणताही करार केला नव्हता, असे राज्याच्या शिक्षण विभागाने सांगितेलेले आहे. दरम्यान, असे असतानाच 17 मुलांना ओलीस ठेवण्यासाठी रोहित आर्याने चांगलाच फुलप्रुफ प्लॅन आखला असल्याचे समोर आले आहे. त्याने याच आरए स्टुडिओत ऋचिता जाधव या अभिनेत्रीलाही बोलवलं होतं. अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. खुद्द ऋचितानेच ही खळबळजक माहिती सांगितली आहे.

अभिनेत्री ऋचिता जाधव हिलाही केला होता कॉल

मुलांना ओलीस ठेवण्याचा कटाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याआधी रोहित आर्या गेल्या काही दिवसांपासून या कटाचे नियोजन आखत होता. त्याने एक चित्रपट करायचा असून त्यासाठी ऑडिशन ठेवण्यात आल्याचे ढोंग रचले होते. याच कटाचा भाग म्हणून त्याने अभिनेत्री ऋचिता जाधव हिलाही कॉल केला होता. मी तुला चित्रपटात काम करण्याची संधी देतो, तू आरए स्डुडिओत ये, असे रोहित आर्याने तिला सांगितले होते. मात्र घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाल्याने ऋचिता सुदैवाने आरए स्टुडिओत जाऊ शकली नाही. त्यानंतर रोहित आर्याचे हे मुलांना ओलीस ठेवण्याचे कारस्थान समोर आले. याबाबत ऋचिता जाधवने टीव्ही 9 मराठीशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

ऋचिता जाधवने नेमकी काय माहिती दिली.

रोहित आर्या याने मला 4 ऑक्टोबर रोजी एक मेसेज केला होता. मी एक चित्रपट करणार आहे आणि मला त्याच्याबाबतीत तुमच्याशी चर्चा करायची आहे, अशा आशयाचा हा मेसेज होता. इंग्रजी भाषेत त्याने हा मेसेज केला होता. आपण याबाबतीत बोलूयात, असं मी त्याला म्हणाले होते. संध्याकाळी मी फ्री झाल्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसात वाजता आमचे संभाषण झाले. आम्ही साधारण 9 मिनिटे फोनवरून बोललो. फोन कॉलदरम्यान त्याने मला चित्रपटाची कथा काय असेल याबाबत सांगितले. एक चांगला माणूस असतो. दहशतवादी नसतो. तो विद्यार्थ्यांना डांबून ठेवतो. त्याच्या काही मागण्या असतात. सरकारपर्यंत त्याला या मागण्या पोहोचवायच्या असतात. तो अतिशय चांगला माणुष्य असतो, अशी चित्रपटाची कथा त्याने मला सांगितली होती, अशी माहिती ऋचिता जाधवने टीव्ही 9 मराठीला दिली.

रोहित आर्याने भेटण्याचा केला होता आग्रह

चित्रपटाची कथा ऐकून घेतल्यानंतर मग या कथेमध्ये माझी भूमिका काय असेल? असे मी त्याला विचारलं होतं. त्याला उत्तर म्हणून तू विद्यार्थ्यांसोबत असलेल्या शिक्षिकेचा किंवा विद्यार्थ्याच्या पालकाची भूमिका कर. किडनॅपरचा मेसेज पोहोचवण्याचे काम तुझ्यावर तुझ्या पात्राचे असेल, असे रोहित आर्याने सांगितल्याचेही ऋचिता जाधवने सांगितले. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर मी यावर विचार करते आणि कळवते, असे रोहित आर्याला सांगितले होते. ऑडिशन लवकरच सुरू होणार असल्याचे त्याने मला सांगितले. तसेच येऊन भेटण्यासही आग्रह केला. यावेली त्याने वेनस्डे या हिंदी चित्रपटाचेही उदाहरण दिले होते. दिवळीच्या काळात त्याने मला हॅपी दीपावलीचा मेसेज केला होता. मी त्याला काही रिप्लाय केला नव्हता. त्याने नंतर मला 27, 28, किंवा 29 ऑक्टोबर रोजी भेटायचे का? असे विचारले होते. मी त्याला 28 तारखेला भेटुयात असे सांगितले. त्याने मला आरए स्टुडिओचे गुगल लोकेशन पाठवले होते, अशी माहिती ऋचिता जाधवने दिली.

सर्वांनी काळजी घ्या, कुटुंबाला माहिती द्या- ऋचिता जाधव

पुढे बोलताना, माझे सासरे राजेंद्र माने यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आमचे सर्व कुटुंब त्याच गडबडीत होते. त्यामुळे मी त्याला मसेज केला की मी येऊ शकत नाही, असे रोहित आर्याला सांगितले. आपण 15 नोव्हेंबरनंतर भेटुयात असा त्याला मेसेज केला. त्यानंतर टेक केअर असा त्याचा मला शेवटचा मेसेज होता, असे सांगत सर्वांनी काळजी घ्या. कुठे जात असाल तर कुटुंबाला त्याची माहिती द्या, असे आवाहन ऋचिता जाधवने केले.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.